Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Metro: पुण्याच्या विकासाला ‘मेट्रो’ची गती; हिंजवडी अन् पश्चिम पुण्यात रिअल इस्टेटचा सुवर्णकाळ

Hinjawadi Shivajinagar Metro Line 3 : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमुळे या परिसरात निवासी मालमत्तांना मोठी मागणी आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरला जोडणाऱ्या २३ किमी लांबीच्या मेट्रो लाईन ३ पैकी पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांवर मे २०२६ पासून सेवा सुरू झाली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 04, 2026 | 04:11 PM
Pune Metro, Pune Metro Line 1, Mahametro,

Pune Metro, Pune Metro Line 1, Mahametro,

Follow Us
Follow Us:
  • मेट्रो लाईन ३ (२३ किमी): हिंजवडी आयटी हब ते थेट शिवाजीनगर सेंट्रल कनेक्टिव्हिटी.
  • उड्डाणपूल व रस्ते रुंदीकरण: बाणेर-शिवाजीनगर डबल डेकर उड्डाणपूल आणि गणेशखिंड रस्ता रुंदीकरण.
  • प्रमुख फायदेशीर परिसर: बाणेर, बालेवाडी, वाकड, ताथवडे, मान आणि पुनावळे.
Pune Metro: पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्र सध्या नव्या वाढीच्या टप्प्यात प्रवेश करत असून, वेगाने विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधा आणि विस्तारणाऱ्या व्यावसायिक केंद्रांमुळे गृहखरेदीदार तसेच विकासकांचा ओढा पश्चिम पुण्यातील ‘मायक्रो-मार्केट्स’कडे वाढला आहे. मेट्रो लाईन ३, रिंग रोड आणि नवीन द्रुतगती मार्गांमुळे या परिसराचा कायापालट होत असल्याचे चित्र आहे.

मेट्रो लाईन ३ मुळे प्रवासाचा वेळ वाचणार

हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमुळे या परिसरात निवासी मालमत्तांना मोठी मागणी आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरला जोडणाऱ्या २३ किमी लांबीच्या मेट्रो लाईन ३ पैकी पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांवर मे २०२६ पासून सेवा सुरू झाली आहे. संपूर्ण मार्गिका पूर्णत्वाकडे जात असून, गणेशखिंड रस्ता रुंदीकरण आणि बाणेर-शिवाजीनगर डबल डेकर उड्डाणपुलामुळे शहराच्या मध्यवर्ती भागाशी संपर्क अधिक सुलभ होत आहे. या सुधारित कनेक्टिव्हिटीचा फायदा बाणेर, बालेवाडी, वाकड आणि ताथवडे या विकसित भागांसोबतच मान आणि पुनावळे या उदयोन्मुख बाजारपेठांनाही मोठ्या प्रमाणावर होत आहे.

PMC Health Department: पुणे महापालिकेत ५८१ आरोग्य पदे रिक्त; रुग्णालये अन् दवाखान्यांवर अतिरिक्त ताण!

“मेट्रो लाईन ३ मुळे हिंजवडी व मध्यवर्ती पुण्यातील प्रवासाचा वेळ वाचेल. बाणेर-बालेवाडीतील वाहतूक कोंडी कमी होऊन डेक्कन व सिव्हिल कोर्टसारख्या भागांत पोहोचणे सुलभ होईल. यामुळे परिसरातील राहणीमानात सकारात्मक बदल घडत आहेत.”
— सचिन भंडारी, सीईओ व कार्यकारी संचालक,

कार्यालयीन आणि निवासी मागणीत मोठी वाढ

अनारॉक संशोधन च्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये देशातील सात प्रमुख शहरांमध्ये ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’ने ३२.४६ दशलक्ष चौरस फूट कार्यालयीन जागा भाडेतत्त्वावर घेतली. यातील सुमारे १५ टक्के (४.८ दशलक्ष चौरस फूट) व्यवहार एकट्या पुण्यात झाले आहेत. यामुळे पश्चिम पुण्यात कार्यालयीन आणि निवासी दोन्ही क्षेत्रांत प्रचंड मागणी निर्माण झाली आहे.

PMC News: न्यायालयाचे आदेश अन् बेलीफ पालिकेत! पुणे पालिका आयुक्तांची खुर्ची जाता जाता राहिली

एकात्मिक प्रकल्पांवर विकासकांचा भर

हिंजवडीच्या आजूबाजूला मोठ्या भूखंडांची उपलब्धता असल्याने विकासक आता एकात्मिक टाउनशिप आणि मिश्र-वापर प्रकल्पांवर भर देत आहेत. व्हीटीपी रियल्टी सारख्या संघटित विकासकांनी पायाभूत सुविधांच्या विकासाशी सुसंगत रणनीती आखत मान आणि पुनावळे यांसारख्या उच्च-वाढीच्या कॉरिडॉर मध्ये नवीन प्रकल्पांची घोषणा केली आहे. एकंदरीत, रस्ते आणि मेट्रोच्या भक्कम जाळ्यामुळे पश्चिम पुण्याचा विकास अधिक व्यापक आणि शाश्वत स्वरूपात होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 

Web Title: Pune metro line 3 real estate boom hinjawadi baner wakad punawale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • Pune Metro
  • real estate

संबंधित बातम्या

Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल
1

Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल

Ganeshotsav: ना दरवाढ, ना हाल! गणेशोत्सवात पुणेकरांचा प्रवास होणार सोपा; PMP चा मोठा दिलासा
2

Ganeshotsav: ना दरवाढ, ना हाल! गणेशोत्सवात पुणेकरांचा प्रवास होणार सोपा; PMP चा मोठा दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.