Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav: ना दरवाढ, ना हाल! गणेशोत्सवात पुणेकरांचा प्रवास होणार सोपा; PMP चा मोठा दिलासा

Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोने विशेष वेळापत्रक जाहीर केले आहे. १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान मेट्रोची सेवा नियमित वेळेनुसार सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 16, 2026 | 04:14 PM
पुणे गणेशोत्सव 2026

पुणे गणेशोत्सव 2026

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवात पीएमपीची जादा बस सेवा
  • गणेशोत्सवात रात्री दोनपर्यंत सेवा
  • पीएमपीच्या तिकीटदरात वाढ नाही
पुणे/Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या काळात गणपती दर्शन आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी शहरात येणाऱ्या भाविकांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) विशेष बससेवेचे नियोजन केले आहे. १७ ते २५ सप्टेंबरदरम्यान ६२६ जादा बसेस सोडण्यात येणार असून, १९ सप्टेंबरपासून रात्रीची बससेवा मध्यरात्री दोनपर्यंत सुरू राहणार आहे. विशेष बससेवेसाठी नियमित तिकीटदरच आकारला जाणार असून, दरवाढ करण्यात आलेली नाही.

गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद किंवा वळविण्यात येणार आहेत. शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड आणि टिळक रोडवरील वाहतुकीत बदल होणार असल्याने पीएमपीच्या नियमित बसमार्गांमध्येही आवश्यकतेनुसार बदल केले जाणार आहेत.

PMP चा उधळपट्टीविरोधात ‘सर्जिकल स्ट्राइक’! अनावश्यक खरेदीवर बंदी अन् २४ तासांत…

भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका भवन, डेक्कन आणि स्वारगेट या प्रमुख ठिकाणांहून अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. गर्दी वाढल्यास मागणीनुसार आणखी बस सोडण्याची तयारी पीएमपीने ठेवली आहे. तसेच, पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी १७ ते २५ सप्टेंबरदरम्यान १४७ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवातील पीएमपी सेवा

जादा बसेस : ६२६
विशेष बससेवा : १७ ते २५ सप्टेंबर
रात्रीची सेवा : १९ सप्टेंबरपासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत
प्रमुख बसस्थानके : महापालिका भवन, डेक्कन, स्वारगेट
पिंपरी-चिंचवडसाठी : १४७ जादा बसेस
तिकीटदर : नियमित दरानुसार; कोणतीही वाढ नाही

Pune Ganeshotsav: ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; पुण्यात मानाच्या गणपतींचे दिमाखात आगमन!

गणेशोत्सवात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोने विशेष वेळापत्रक जाहीर केले आहे. १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान मेट्रोची सेवा नियमित वेळेनुसार सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान मेट्रोची सेवा सकाळी ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. मेट्रोला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने गणेशोत्सवापासून गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारता वाढविण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात मेट्रो स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाईल, पाकीट, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवाव्यात.

Web Title: 626 additional pmp buses will run during ganeshotsav 2026 in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • PMPML Bus
  • pune ganpati
  • Pune Metro

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: देवाला दाखवलेला नैवेद्य कधीपर्यंत समोर ठेवावे, काय आहे शास्त्राचा नियम
1

Ganeshotsav 2026: देवाला दाखवलेला नैवेद्य कधीपर्यंत समोर ठेवावे, काय आहे शास्त्राचा नियम

Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप
2

Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप

Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे
3

Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे

Gauri Aagman 2026: फुले, दिवे आणि कापडाने घरच्या घरी करता येतील ‘या’ भन्नाट आयडिया
4

Gauri Aagman 2026: फुले, दिवे आणि कापडाने घरच्या घरी करता येतील ‘या’ भन्नाट आयडिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.