Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल

Pune Metro: गणेशोत्सवातील वाढती गर्दी पाहता मध्यवर्ती पुण्यात पोहोचण्यासाठी मेट्रोचा वापर आणखी वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून मेट्रोची सेवा रात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 20, 2026 | 02:35 AM
पुणे गणेशोत्सव 2026

पुणे गणेशोत्सव 2026

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवात मेट्रोच्या प्रवासीसंख्येला ‘वेग’
  • चार दिवसांत दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ
  • महसुलातही १८.४१ लाखांची भर
पुणे/Pune Metro: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पुण्यातील गर्दी वाढत असताना, उपनगरांतून शहराच्या मध्यवर्ती भागात पोहोचण्यासाठी पुणेकरांकडून मेट्रोला मोठी पसंती मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मेट्रोच्या प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ होत असून, अवघ्या चार दिवसांत दैनंदिन प्रवासीसंख्येत तब्बल १ लाख १० हजारांहून अधिक वाढ झाली आहे. याचा परिणाम मेट्रोच्या दैनंदिन महसुलावरही झाला आहे.
वनाज-रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड-स्वारगेट या दोन्ही मार्गांवर १४ सप्टेंबर रोजी एकूण २ लाख ६२ हजार ६७१ प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ झाली. १५ सप्टेंबरला २ लाख ८७ हजार ९००, १६ सप्टेंबरला ३ लाख १९ हजार ९१५, तर १७ सप्टेंबरला तब्बल ३ लाख ७२ हजार ८३२ प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला.
पुणेकरांसाठी गूड न्यूज! गणेशोत्सवात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; रात्री 2 अन् अनंत चतुर्दशीला सलग 41 तास…
गणेशोत्सवात शहरातील प्रमुख गणेश मंडळे, देखावे आणि बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. उपनगरांमध्ये वाहने पार्क करून कुटुंबासह मध्यवर्ती पुण्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने मेट्रोच्या प्रवासीसंख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी मेट्रो प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात येत आहे.
गणेशोत्सवातील वाढती गर्दी पाहता मध्यवर्ती पुण्यात पोहोचण्यासाठी मेट्रोचा वापर आणखी वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून मेट्रोची सेवा रात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शहरातील अनेक देखावे रात्री बारापर्यंत सुरू राहणार असल्याने पुढील काही दिवसांत प्रवासीसंख्या वाढण्याची शक्यता असून, त्यानुसार मेट्रो प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.

Pune Metro Line 1 Technical Snag: पुणे मेट्रोचा वीजपुरवठा खंडित; सुरक्षेसाठी ८ मेट्रो ट्रेन्स प्लॅटफॉर्मवर थांबवल्या

महसुलातही वाढ 
प्रवासीसंख्येबरोबरच मेट्रोच्या महसुलातही वाढ झाली आहे. १४ सप्टेंबर रोजी दोन्ही मार्गांवरून ४३ लाख १९ हजार ७०७ रुपयांचा महसूल मिळाला होता. १७ सप्टेंबरला हा महसूल वाढून ६१ लाख ६१ हजार १२३ रुपयांवर पोहोचला. म्हणजेच चार दिवसांत दैनंदिन महसुलात सुमारे १८.४१ लाख रुपयांची वाढ झाली. १७ सप्टेंबर रोजी वनाज-रामवाडी मार्गावर १ लाख ९५ हजार २३१, तर पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मार्गावर १ लाख ७७ हजार ६०१ प्रवाशांनी प्रवास केला.

Web Title: Pune metro daily ridership increases by more than 110 lakh and 18 lakhs revenue ganpati festival 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • pune ganpati
  • Pune Metro
  • pune news

संबंधित बातम्या

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय
1

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ
2

अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी
3

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात
4

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.