Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आचारसंहितेच्या शक्यतेमुळे प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर; कोट्यवधी रुपयांच्या निविदांना मंजूरी

महापालिका निवडणुकीची आचारसंहीता लागू हाेण्यापूर्वी स्थायी समितीत काेट्यवधी रुपयांच्या निविंदाना शनिवारी मंजुरी देण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 07, 2025 | 11:27 AM
आचारसंहितेच्या शक्यतेमुळे प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर; कोट्यवधी रुपयांच्या निविदांना मंजूरी

आचारसंहितेच्या शक्यतेमुळे प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर; कोट्यवधी रुपयांच्या निविदांना मंजूरी

Follow Us
Close
Follow Us:
  • आचारसंहितेच्या शक्यतेने प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर
  • कोट्यवधी रुपयांच्या निविदांना मंजूरी
  • महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीची आचारसंहीता लागू हाेण्यापूर्वी स्थायी समितीत काेट्यवधी रुपयांच्या निविंदाना शनिवारी मंजुरी देण्यात आली आहे. या महीन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहीता लागू हाेण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून सर्वच विभागाकडील प्रस्तावित कामांच्या निविदा समितीसमाेर मान्यतेला ठेवण्यात आल्या हाेत्या.

महापालिका आयुक्त नवल किशाेर राम यांनी नुकताच सर्व विभागांच्या कामाचा आढावा घेतला हाेता. प्रस्तावित कामांच्या निविदा तातडीने सादर करण्यात याव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या हाेत्या. विधीमंडळाचे नागपुर अधिवेशन ८ डिसेंबरपासून सुरु हाेत आहे, ते १४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यानंतर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम आणि आचारसंहीता लागू केली जाऊ शकते. या पार्श्वभुमीवर प्रशासनाने पुर्ण झालेल्या कामांचे लाेकार्पण आणि प्रस्तावित कामांच्या निविदांना मंजुरी देण्याची भुमिका घेतली आहे. लाेकप्रतिनिधी असतानाही ज्या पद्धतीने घाई घाईने प्रस्ताव दाखल आणि मंजुर केले गेले जात हाेते. त्याच पद्धतीने प्रशासकीय कालावधीत प्रस्तावांना मंजुरी मिळत आहे.

डॉक्टरांचा पगार थेट दुप्पट

पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांना आवश्यक ती वैद्यकीय सेवा मिळत नव्हती. कमी पगारामुळे येथे डॉक्टर नोकरीसाठी येत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर आल्या होत्या. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा मासिक पगार सव्वा लाख रुपये वरून थेट अडीच लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये फिजिशियन ( ५ ), भुल तज्ञ (२), स्त्रीराेग तज्ञ ( ८ ), बालराेग तज्ञ ( ९ ) यांचा समावेश आहे. या पदांसाठी पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना अडीच लाख रुपये तर पदव्युत्तर पदविका असलेल्या उमेदवारांना दिड लाख रुपये इतके वेतन दिले जाणार आहे. डाॅक्टर, नर्सेस यांची संख्या कमी असल्याने या रुग्णालयातील सेवेवर परीणाम हाेत आहे, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

शंभर निविदांना मंजूरी

स्थायी समितीच्या बैठकीत विविध कामांच्या शंभर निविदांना मंजुरी दिली गेली आहे. यामध्ये शहरात कचरा संकलनासाठी महापालिका ३४० छोटया घंटागाडया भाडे तत्वावर घेणार आहे. छोटया घंटा गाडयांसह १२ काॅम्पॅक्टर, ११ बीन लिफ्टरचाही समावेश आहे. त्यासाठी पुढील पाच वर्षात २८४ कोटी रूपये खर्च करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

Web Title: Pune municipal administration has approved tenders worth crores of rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 11:25 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

…तर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही; युवा सेनेचा इशारा
1

…तर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही; युवा सेनेचा इशारा

युवा सामाजिक व शैक्षणिक संघटना आक्रमक, ‘या’ तारखेला नागपुरात करणार आंदोलन
2

युवा सामाजिक व शैक्षणिक संघटना आक्रमक, ‘या’ तारखेला नागपुरात करणार आंदोलन

समाजाच्या गरजा समजून घेतल्याशिवाय उद्योजकता शक्य नाही; एमकेसीएलचे संस्थापक विवेक सावंत यांचे मत
3

समाजाच्या गरजा समजून घेतल्याशिवाय उद्योजकता शक्य नाही; एमकेसीएलचे संस्थापक विवेक सावंत यांचे मत

कामावर असताना मृत्यू झाल्यास तातडीने 5 लाखांची मदत देणार; पुणे महापालिकेचा मोठा निर्णय
4

कामावर असताना मृत्यू झाल्यास तातडीने 5 लाखांची मदत देणार; पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.