Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit pawar : बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव द्या; कुणी केली मागणी ?

बारामती विमानतळाचे नामकरण ‘अजित पवार विमानतळ, बारामती’ असे करण्यात यावे, अशी मागणी हवाई तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 02, 2026 | 04:05 PM
बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव द्या; कुणी केली मागणी ?

बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव द्या; कुणी केली मागणी ?

Follow Us
Follow Us:
  • बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव द्या
  • सार्वजनिक जीवनातील कार्याचा सन्मान ठरेल
  • हवाई तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांची मागणी
पुणे : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. अजित पवार 66 वर्षांचे होते. अजित पवार यांच्यासह पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला. अजित पवारांच्या मृत्यूनंतर हवाई तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी मोठी मागणी केली आहे. अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बारामती विमानतळाचे नामकरण ‘अजित पवार विमानतळ, बारामती’ असे करण्यात यावे, अशी मागणी हवाई तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी केली आहे.

 

धैर्यशील वंडेकर म्हणाले, २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळ परिसरात झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेत त्यांचे अकाली निधन झाले. दिवंगत अजितदादा पवार यांनी सिंचन, जलसंपदा, वित्त, सहकार, ऊर्जा व नियोजन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळत राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासात मोलाचे योगदान दिले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीला ‘बारामती मॉडेल’ या एकात्मिक ग्रामीण विकासाच्या आदर्श उदाहरणात रूपांतरित करण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.

तसेच सिंचन प्रकल्प, सहकार चळवळ बळकटीकरण, पायाभूत सुविधा, शिक्षण, उद्योग, कृषी व पर्यटनक्षेत्रात त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. बारामती विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठीही त्यांचे विशेष नियोजन होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विकासकामांना गती देण्याचे निर्देश दिले होते. राज्य व केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यास दिवंगत अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा सन्मान ठरेल, असं वंडेकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सादर; पैसा कुठे खर्च होणार? वाचा सविस्तर

Web Title: There is a demand to name baramati airport after ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • murlidhar mohol

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा
4

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.