zika virus in pune
पुणे : पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे हवामान बदल होत असून साथीचे रोग वाढत आहेत. रौगाचा फैलाव होत असून यामुळे पुणेकरांच्या चिंता वाढल्या आहेत. शहरामध्ये चिकनगुनिया व डेंग्यु सारखे विषाणू पसरत आहेत. त्याचबरोबर पुण्यामध्ये झिका व्हायरस देखील वाढ झाली आहे. पुण्यामध्ये झिकाच्या रुग्णांची संख्या वाढली असून 66 वरती पोहोचली आहे. आतापर्यंत झिकाचा संसर्ग झाल्यामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. झिका व्हायरसची लागण गर्भवती महिलांना जास्त होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.
पुणे शहरामध्ये झिकाच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ झाली आहे. दिवसेंदिवस झिकाचे रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असून यामध्ये गर्भवती महिलांची संख्या जास्त आहे. आत्तापर्यंत झिका व्हायरसची लागण झालेले 66 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये तब्बल 26 गर्भवती महिलांना झिका व्हायरची लागण झालेली आहे. ही झिका व्हायरसची सर्वात जास्त लागण ही गर्भवती महिला, लहान मुले त्यांच्यासह वृध्दांना देखील होत आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. यामुळे आरोग्य विभागावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पुण्यातील वाढत्या झिकाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता पुणे महानगर पालिका ॲक्शनमोडमध्ये आली आहे. झिकाची लागण झालेल्या आणि संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी होणार आहे.