
संतापजनक! शाळेच्या गेटसमोरच तरुणाचे अश्लील चाळे; नगरसेविकेने घेतली दखल
दरम्यान, हा प्रकार समोर येताच एका नगरसेविकाने याची गंभीर दखल घेत पोलिसांकडे संबंधित तरुणाविरोधात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात मात्र, चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात प्रणव केदार (रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) असे गुन्हा नोंदवण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार या नगरसेविका असून, त्यांचे शिवाजीनगर भागात सामाजिक कार्य आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी आरोपी संबंधित शाळेच्या गेटसमोर कारमध्ये बसलेला होता. त्याने हातात मोबाईल धरून तो पाहत अश्लील चाळे करण्यास सुरूवात केली. हा प्रकार काही विद्यार्थी व विद्यार्थिंनी पाहिला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. हा प्रकार उजेडात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. याची माहिती नगरसेविकाला समजली. त्यांनी तत्काळ येथे दाखल होत, चौकशी केली व शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या तरुणाचे सातत्याने असे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून तरुणाचा शोध घेतला जात असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.
प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने केला अत्याचार
झारखंडच्या पाकूर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रियकराने आपल्या अल्पवयीन प्रेयसीला भेटायला बोलावले. तिला एका निर्जन शेतात नेत, मित्रांसह सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यांनतर मुलीची हत्या करून मृतदेह शेतात फेकून दिला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना तपासात पीडितेचा शेतात मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता तिघांना अटक केली. आरोपींपैकी एकजन पीडित अलपवयीन मुलीचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे. राफेल सोरेन असे प्रियकर आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सध्या दोघांना तुरुंगात पाठवले, तर एक अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधागृहात पाठवण्यात आले.