Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने चार ते पाच वाहनांना उडविले

कात्रज बोगद्याजवळ साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने चालेल्या एका भरधाव कंटेनरने तीन वाहनांना धडक देऊन भीषण अपघात घडल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 06, 2026 | 11:41 AM
कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने चार ते पाच वाहनांना उडविले

कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने चार ते पाच वाहनांना उडविले

Follow Us
Follow Us:
  • कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात
  • कंटेनरने चार ते पाच वाहनांना उडविले
  • वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप, दूरवर रांगा
पुणे : कात्रज बोगद्याजवळ साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने चालेल्या एका भरधाव कंटेनरने तीन वाहनांना धडक देऊन भीषण अपघात घडल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली आहे. या अपघातात सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र, काही काळ महामार्ग खोळंबला होता. दरम्यान, अग्निशमन दलाने एका कारमध्ये अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली आहे.

 

चरणदास लक्ष्मण आकटे (वय ६४, रा. रत्नागिरी) तसेच आश्यप्पा गुरू सिद्धप्पा मस्तीहोली (वय ३५, रा. कर्नाटक) हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. चरणदास हे त्यांच्या कारने मुंबईकडे जात होते. तर, मस्तीहोली हा त्याच्याकडील सिमेंटचा बंकर घेऊन निघाला होता. त्याचे कात्रज बोगद्याजवळ भरधाव कंटेनरवरील नियत्रंण सुटल्यानंतर त्याने प्रथम एका कारला जोराची धडक दिली. त्यानंतर तो तिथे न थांबता तो पुढे जाऊन एका हॉटेलसमोर त्याने दुसऱ्या दोन वाहनांना उडविले. त्यानंतर कंटेनर एका ठिकाणी रोडच्या कडेला उलटला गेला. त्यामुळे पुढील मोठा धोका टळला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, अचानक झालेल्या या अपघातामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. अपघात पाहणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडला होता. याची माहिती मिळताच आंबेगाव पोलिस तसेच अग्निमशन दलाने याठिकाणी धाव घेतली. त्यांनी एकाला कारमधून बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पुर्ववत केली. सुदैवाने जिवीतहानी झाली नसल्याचे समजते. अपघातात कारमधील व्यक्ती जखमी झाले आहेत.

भेदरलेला आवाज अन् सुटकेचा थरार

अपघातात एक कारचालक गाडीमध्ये अडकला गेला होता. गाडी चारही बाजूने दबली गेली होती आणि तो आतमध्ये अडकला गेला होता. तो आतून आवाज देता होता. त्याचवेळी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या व्यक्तीला धीर देत त्याची सुटका करण्यास सुरूवात केली. कारचा पत्रा कापून संबंधित व्यक्तीला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले. हा प्रसंग थरारक होता.

हे सुद्धा वाचा : धरणग्रस्तांना मोठा दिलासा; उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ स्थगिती

वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप, दूरवर रांगा

कंटेनरच्या धडकेत वाहनांचे नुकसान झाले आहे. तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. दरम्यान, कात्रज बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागला. प्रामुख्याने महामार्गावरच कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तत्काळ अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतूकीसाठी खुला केला.

Web Title: A shocking incident has taken place near the katraj tunnel where a container hit four to five vehicles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Accident Case
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

Hinjawadi Shivaji Nagar Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो १५ जुलैला धावणार!
1

Hinjawadi Shivaji Nagar Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो १५ जुलैला धावणार!

Shivajinagar ST Stand: ६ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी शिवाजीनगर एसटी प्रशासनाचा नवा प्लॅन; आरे’च्या जागेची मागणी
2

Shivajinagar ST Stand: ६ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी शिवाजीनगर एसटी प्रशासनाचा नवा प्लॅन; आरे’च्या जागेची मागणी

मोठी बातमी ! कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला राजस्थानातून अटक; 9 महिन्यांपासून होता फरार
3

मोठी बातमी ! कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला राजस्थानातून अटक; 9 महिन्यांपासून होता फरार

महाळुंगे एमआयडीसीतून 81 सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची मोठी कारवाई
4

महाळुंगे एमआयडीसीतून 81 सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.