Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indrayani River Flood: इंद्रायणीचे पाणी ओसरले, पण जखमा कायम! देहू आणि आळंदीत संसाराचा कोळसा

देहू शहरात अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढे, नाले तसेच इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढून अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून घरे, दुकाने, जीवनावश्यक वस्तू, व्यावसायिक साहित्य तसेच इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 11, 2026 | 04:57 PM
Alandi News, Dehu, Indrayani River, Pune Flood, Maharashtra Monsoon

Alandi News, Dehu, Indrayani River, Pune Flood, Maharashtra Monsoon

Follow Us
Follow Us:
  • द्रायणी नदीचे पाणी अखेर ओसरले असून देहूगाव परिसरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
  • नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान
  • लहान व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न
 

Alandi News: रौद्ररूप धारण केलेल्या इंद्रायणी नदीचे पाणी अखेर ओसरले असून देहूगाव परिसरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, पुराचे पाणी ओसरले असले तरी महापुराने दिलेल्या जखमा कायम आहेत. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, लहान व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. Pune  Rain

इंद्रायणी नदीकाठावरील अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने माल खराब झाला आहे. काही व्यावसायिकांची दुकाने आणि साहित्य पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याचे सांगण्यात आले. मंडप व्यावसायिकांनी उभारलेल्या चेंजिंग रूम तसेच मोबाईल टॉयलेटही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी का लांबली? केंद्र सरकारच्या ‘त्या’ डेटामुळे प्रक्रिया रखडली

व्यावसायिक मोठ्या संकटात

इंद्रायणी नदीघाटालगतच्या येलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील धर्मशाळा, घरे आणि दुकानांमध्येही पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला असून, पूर ओसरल्यानंतर नागरिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.मात्र, अद्याप अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याची भावना नागरिक आणि व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. शासनाकडून वेळेत आर्थिक मदत मिळणार का, असा प्रश्न पूरग्रस्तांकडून उपस्थित केला जात आहे.पूरग्रस्त नागरिकांनी शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण करून पंचनामे करावेत आणि पात्र लाभार्थ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

देहू नगरपंचायतीकडे पंचनाम्यांसाठी निवेदन

दरम्यान, देहू शहरातील अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दि. १० रोजी देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, देहू शहरात अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढे, नाले तसेच इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढून अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून घरे, दुकाने, जीवनावश्यक वस्तू, व्यावसायिक साहित्य तसेच इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

माळीण दुर्घटनेनंतरही प्रशासन सुस्त? ७२ पैकी २८ गावांचे पुनर्वसन प्रस्ताव प्रलंबित; मावळ दुर्घटनेनंतर प्रश्न ऐरणीवर

नुकसानग्रस्त भागांचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात यावेत. तसेच शासनाच्या प्रचलित नियमांनुसार पात्र नागरिकांची यादी तयार करून ती महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे त्वरित सादर करण्यात यावी, जेणेकरून नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई मिळू शकेल, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

“इंद्रायणी नदीला लागून असलेल्या खेड तालुक्यातील येलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्त सर्व घरे, दुकाने तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.”

— गणेश कांताराम बोत्रे (पुणे जिल्हा परिषद सदस्य)

 

Web Title: Pune news indrayani river flood recodes dehugaon alandi heavy losses traders demand panchnama

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 04:57 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.