Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Voter List SIR Drive: पुण्यातील तब्बल ११ लाख मतदारांची नावे गायब होणार! २४ ऑगस्टला नवी प्रारूप यादी होणार प्रसिद्ध

या कामासाठी ८ हजार ४१७ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) कार्यरत असून, त्यांनी भरून घेतलेले अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड केले जात आहेत. आतापर्यंत ६२ लाख ३६ हजार ६७१ अर्जाची पडताळणी पूर्ण होऊन ते अपलोड करण्यात आले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 06, 2026 | 08:25 AM
अनिवासी कामगारांची नावे कराड दक्षिणच्या मतदार यादीत आढळल्यास तीव्र आक्षेप

अनिवासी कामगारांची नावे कराड दक्षिणच्या मतदार यादीत आढळल्यास तीव्र आक्षेप

Follow Us
Follow Us:
  • तीन वेळा पंचनामा करूनही मतदार दिलेल्या पत्त्यावर अनुपस्थित, मृत किंवा दुबार आढळणे.
  • २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार.
  • निवडणूक आयोगाने या मोहिमेस १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
 

Pune Voter List SIR Drive: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यात दिलेल्या पत्त्यावर न आढळलेल्या सुमारे ११ लाख मतदारांची नावे २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मतदारांच्या अनुपस्थितीचे तीन वेळा पंचनामे करून ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. त्यामुळे अंतिम आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली. जिल्ह्यात एकूण ९० लाख ८० हजार १७३ मतदार असून, आतापर्यंत ७५ लाख ८९ हजार ६६२ मतदारांना गणना अर्ज वितरित करण्यात आले आहेत.

या कामासाठी ८ हजार ४१७ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) कार्यरत असून, त्यांनी भरून घेतलेले अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड केले जात आहेत. आतापर्यंत ६२ लाख ३६ हजार ६७१ अर्जाची पडताळणी पूर्ण होऊन ते अपलोड करण्यात आले आहेत. दरम्यान, सुमारे १५ लाख गणना अर्ज अद्याप बीएलओकडे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मृत, दुबार आणि अनुपस्थित मतदारांची संख्या लक्षणीय असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज पुन्हा सुनावणी; ठाकरे-शिंदेंचे लागले लक्ष

विशेषतः सुमारे ११ लाख अनुपस्थित मतदारांच्या तीन वेळा पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आयोगाच्या निर्देशानुसार त्यांची नोंद संकेतस्थळावर करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेस १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अद्याप पडताळणी न झालेल्या मतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून संबंधित बीएलओची माहिती मिळवून तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गणना अर्ज वेळेत भरून देणे आवश्यक

मीनल कळसकर यांनी सांगितले की, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही नियमानुसार नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. मात्र, गणना अर्ज वेळेत भरून देणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे दोन लाख मृत मतदार आढळले आहेत. तसेच अनुपस्थित आणि अपूर्ण अजर्जामुळे प्रारूप मतदार यादीतील मतदारसंख्या किमान १२ ते १३ लाखांनी घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

‘भूसंपादन गतिमान करा, उद्योगांना वेळेत जमिनी द्या!’, मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘वर्षा’ निवासस्थानावरील आढावा

 

 

Web Title: Pune news pune voter list sir drive 11 lakh names to be removed draft list august 24

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • Pune Politics
  • SIR

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.