पुरंदरमध्ये 'मॉडेल स्कूल'च्या नावाने लाखोंची लूट? सोनोरीत जुन्याच इमारतीवर बांधल्या दोन खोल्या!
सोनोरी गावच्या शाळेची शासनाच्या मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत निवड झाली असून या माध्यमातून शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करून देतानाच दर्जेदार शाळा दिसण्यासाठी नव्याने बांधकाम करून देण्यात येत आहे. शाळेच्या दोन वर्गखोल्या मंजूर झाल्या असून शाळेचा परिसर विकसित करण्यात येत आहे. वर्गखोल्यांसाठी ४८ लाख ३६ हजार ९८८ रुपये तर शाळा दुरुस्तीसाठी ३० लाख ५१ हजार २९१ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुधीर कातोरे या ठेकेदारास कामाचा ठेका दिला आहे. तर कातोरे याने हेच बांधकाम सोनोरीतील स्थानिक ठेकेदार नितीन काळे यास पोट ठेकेदार म्हणून काम दिले आहे. अशी माहिती पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उप अभियंता संतोष नलावडे यांनी दिली.
दरम्यान सोनोरी मध्ये दोन वर्षापूर्वीच विविध कंपन्यांनी त्यांच्या सीआरएस फंडातून शाळेला दर्जेदार संपूर्ण इमारत बांधून शाळेला संरक्षण भिंत तसेच रंगरंगोटी, स्वतंत्र स्वच्छतागृह करून दिलेली आहे. त्यामुळे शाळेची गरज पूर्ण झाली आहे. मात्र ठेकेदार नितीन काळे याने पंचायत समितीतील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून तीन ते चार वर्षापूर्वी बांधलेल्या शाळेच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर दोन खोल्यांचे बांधकाम केले. आणि दोन खोल्यांच्या बदल्यात तब्बल ४८ लाखांच्या निधी चा भ्रष्टाचार केल्याचा सनसनाटी आरोप आरपीआय ( आठवले ) तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी केला आहे.
वास्तविक मध्ये तीन, चार वर्षापूर्वी शाळेचे बांधकाम केले असून शाळेत फारशी, वाटरप्रूफिंग, रंगकाम, खिडक्या, दरवाजे शाळेला स्टेज असे संपूर्ण काम केले आहे. त्यावर आता जीना, त्यावर लोखंडी ग्रील, संरक्षण भिंतीवर स्टीलचे रेलिंग, स्टेजवर पत्रा अशा किरकोळ कामासाठी तब्बल ३० लक्ष ५१ हजार २९१ रुपयांचा निधी खर्च दाखविला आहे. दोन्ही वर्ग खोल्या आणि इतर कामासाठी फार तर १५ ते २० लक्ष रुपये पुरेसे आहेत. मात्र तब्बल ८० लाखांचा निधी खर्च दाखवला. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला असल्याचे बळीराम सोनवणे यांनी सांगितले आहे.
Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! TMC चं नाव-चिन्ह गोठवलं; नव्या नावासह मिळालं नवं चिन्ह
शाळेच्या बांधकामासाठी एक कोटी २ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामधील जवळपास ३० टक्के म्हणजे २० लाख रुपये विविध करांच्या माध्यमातून कट झाले आहेत. तर प्रत्यक्षात ७८ ते ८० लाखांचे काम करण्यात आले आहे. आतापर्यंत २२ अख रुपये ठेकेदाराला देण्यात आले असून अद्याप पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नाही. काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पैसे काम पाहून देण्यात येतील. असे पुरंदर पंचायत समितीचे बांधकाम उप अभियंता संतोष नलावडे यांनी सांगितले.
यासंदर्भात बोलताना पुरंदरचे आरपीआयचे तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे म्हणाले की, केलेले एकूण काम १५ ते २० लाखांचे असून उर्वरित पैशांचा भ्रष्टाचार आहे. तसेच अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला कामाचे पूर्ण पैसे दिले असून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी केवळ पूर्णत्वाचा दाखला दिलेला नसावा. अधिकारी आणि ठेकेदार आमच्याशी पूर्ण माहिती न देता अरेरावीची भाषा करीत आहेत. यांच्यावर कारवाई होण्यासाठी जीपचे मुख्य कार्यकारी आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार.






