Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari 2026: पुणे महापालिकेची आषाढी वारीसाठी मेगा तयारी! मेट्रो मार्गाखालील अडथळे २ दिवसांत हटवण्याचे आदेश

पाणीपुरवठा विभागाकडून पालखी सोहळ्यादरम्यान पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार असून अतिरिक्त टँकरही उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. पालखी मार्गावरील सुमारे १५ ठिकाणी पाणी वितरण केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 24, 2026 | 08:42 PM
Ashadhi Wari 2026, PMC Pune, Prajit Nair, Palakhi Sohala

Ashadhi Wari 2026, PMC Pune, Prajit Nair, Palakhi Sohala

Follow Us
Follow Us:

Ashadhi Wari news Update : आगामी आषाढी वारी आणि पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने व्यापक तयारी सुरू केली असून विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (इ) प्रजीत नायर यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली. पालखी मार्गावरील स्वच्छता, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, वाहतूक व्यवस्थापन, निवारा व्यवस्था तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील उपाययोजनांचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त परिमंडळ क्र. ५ माधव जगताप, मुख्य अभियंता (पथ विभाग) सोमनाथ बनकर, मुख्य अभियंता (विद्युत विभाग) मनीषा शेकटकर, मुख्य अभियंता (प्रकल्प विभाग) दिनकर गोजारे, उपायुक्त परिमंडळ क्र. २ अविनाश सपकाळ, माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख तुषार बाबर, उपायुक्त आशा राऊत, अभियंता निखील मोरे तसेच उपायुक्त अरविंद माळी उपस्थित होते.

Ashadhi Wari : पंढरीच्या वारीचा ‘असा’ आहे इतिहास; आळंदीहून वारीची …

 

बैठकीत विश्रांतवाडी येथील अंडरपास परिसरात अपघात टाळण्यासाठी आवश्यक बॅरिकेडिंग करण्याच्या सूचना प्रकल्प विभागाला देण्यात आल्या. तसेच शिवाजीनगर परिसरातील मेट्रो मार्गाखालील सर्व अडथळे दोन दिवसांत दूर करण्याचे निर्देश देण्यात आले.

घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पालखी मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी पोर्टेबल शौचालयांची उभारणी करण्यात येणार असून त्यांच्या स्वच्छतेसाठी जेटिंग मशीन व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.पालखी आगमनापूर्वी व प्रस्थानानंतर मुक्कामस्थळे आणि पालखी मार्गाची तातडीने स्वच्छता करण्यात येणार असून दुर्गंधीनाशक व कीटकनाशक फवारणीही केली जाणार आहे.

विद्युत विभागाकडून पालखी मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त प्रकाशयोजना करण्यात येणार आहे. तसेच सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे देखरेख ठेवण्यात येणार असून आवश्यकतेनुसार डीजी बॅकअपचीही व्यवस्था केली जाणार आहे. नियंत्रण कक्षातून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार असून ध्वनीप्रक्षेपण वाहनांद्वारे वारकऱ्यांना आवश्यक सूचना व जनजागृती संदेश दिले जाणार आहेत.

Ashadhiwari : वारी म्हणजे काय ? संत तुकोबांनी अभंगातून सांगितला वारीचा …

 

आरोग्य विभागाने पालखी कालावधीत सर्व दवाखान्यांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याचे नियोजन केले आहे. यासाठी सुमारे ४० आरोग्य पथके, ३० डॉक्टर आणि रुग्णवाहिका सेवा तैनात करण्यात येणार आहेत. वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार असून फूट मसाज मशीन तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मसाज सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

वॉर्ड कार्यालये आणि क्षेत्रीय उपायुक्त कार्यालयांमार्फत आवश्यक त्या ठिकाणी मंडप, दर्शनबारी आणि बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. पोलिस विभागाच्या मार्गदर्शनानुसार पार्किंग व्यवस्था, दिशादर्शक फलक आणि इतर सुविधा उभारण्यात येतील. अतिक्रमण विभागाकडून पालखी आगमनाच्या किमान पाच दिवस आधी मार्गावरील सर्व अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

पालखी मार्गावरील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी विशेष स्वच्छता अभियान हाती घेण्यात येणार असून दिवसातून किमान चार वेळा स्वच्छता करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. तसेच मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून रस्ते सुरक्षित करण्यात येणार असून चेंबर्स रस्त्याच्या समपातळीत आणण्यात येणार आहेत.

भवन विभागामार्फत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येणार आहेत. निवडक ठिकाणी मोठ्या मैदानांवर जर्मन हॅन्गर उभारून त्यामध्ये वारकरी कार्यालय, विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष, स्नानगृह, स्वच्छतागृह, आरोग्य शिबिरे आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीपूर्वी मंदिर परिसरातील कामे पूर्ण करा

पाणीपुरवठा विभागाकडून पालखी सोहळ्यादरम्यान पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार असून अतिरिक्त टँकरही उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. पालखी मार्गावरील सुमारे १५ ठिकाणी पाणी वितरण केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पशुवैद्यकीय विभागाकडून पालखीसोबत येणाऱ्या बैल, घोडे आणि इतर जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र पशुवैद्यकीय पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच कीटकनाशक विभागामार्फत पालखी व दिंडी मुक्कामस्थळांवर आगाऊ फवारणी करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाकडून मुक्कामासाठी शाळा उपलब्ध करून देत वारकरी आणि दिंडींसाठी आवश्यक मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

यावेळी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून पालखी सोहळा सुरक्षित, स्वच्छ आणि सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वारकऱ्यांना सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महानगरपालिका कटिबद्ध असून पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभाग सज्ज असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

 

Web Title: Pune pmc ashadhi wari palakhi route preparations prajit nair orders metro clearance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026

संबंधित बातम्या

Pandharpur Ashadhi Wari 2026: ‘वारीत सुविधा, सेवेत कसूर नाही! साडेचार कोटींच्या कामांना जिल्हा परिषदेची ऐतिहासिक मंजुरी
1

Pandharpur Ashadhi Wari 2026: ‘वारीत सुविधा, सेवेत कसूर नाही! साडेचार कोटींच्या कामांना जिल्हा परिषदेची ऐतिहासिक मंजुरी

वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाचे व्यापक नियोजन; मुख्यमंत्री फडवणीस यांची माहिती
2

वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाचे व्यापक नियोजन; मुख्यमंत्री फडवणीस यांची माहिती

Ashadhi Ekadashi 2026: विठ्ठलाच्या लेपन प्रक्रियेस स्थगिती! वारकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर देण्यात आला निर्णय
3

Ashadhi Ekadashi 2026: विठ्ठलाच्या लेपन प्रक्रियेस स्थगिती! वारकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर देण्यात आला निर्णय

Ashadhi Wari 2026: पंढरी वारीतील अनोळखीवर वॉच! सुरक्षा कलम १६३ लागू; भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक
4

Ashadhi Wari 2026: पंढरी वारीतील अनोळखीवर वॉच! सुरक्षा कलम १६३ लागू; भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.