आषाढी वारीपूर्वी मंदिर परिसरातील कामे पूर्ण करा; जिल्हाधिकाऱ्यांचे संबंधित यंत्रणांना आदेश
यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन म्हणाले, अधिक मासातील एकादशीनिमित्त मंदिर समिती मार्फत दर्शन रांगेत भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, विश्रांती कक्ष, भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा, शौचालय, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दर्शन रांगेतील भाविकांचे जलद व सुलभ दर्शन व्हावे यासाठी व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. दर्शन रांगेत घुसखोरी करणारे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी प्रांताधिकारी यांनी दररोज सीसीटीव्हीची पाहणी करावी व यामध्ये दोषी आढळल्यास तात्काळ कारवाई करावी. दर्शन रांग व मंदिर परिसरात आरोग्य सुविधा केंद्र वाढविण्यात येणार.सद्यस्थितीत दर्शनी मंडपाचे काम सुरू असून आषाढी वारीत पावसामुळे चिखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात डिझेल पेट्रोल व गॅसची टंचाई नसून, पुरवठा सुरळीत सुरू आहे. आषाढी वारी कालावधीत देखील टंचाई निर्माण होणार नाही दक्षता घेण्यात आली आहे.आषाढी यात्रा कालावधीत पालखी मार्गावर ज्यादा जर्मनी हँगरची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. भाविकांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी टू व्हीलर ॲम्बुलन्सची संख्या वाढविण्यात येणार आहे. दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये याची दक्षता घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. शहरातील अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावीत. तसेच अतिक्रमण होणार नाही याबाबत कायमस्वरूपी नियोजन करण्यात यावे. मंदिर परिसरात फिरत्या विक्रेत्यांचा भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने सदर विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करावी.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाखरी ते पंढरपूर रस्त्याचे काम सुरू असून वारी अगोदर साईड पट्टी स्वच्छ करण्याचे तसेच दोन्ही पुलावरील मुरमीकरण व सपाटीकरण 25 जून पर्यंत पूर्ण करावे. नगरपालिकेने नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करावेत. खाद्यपदार्थांच्या दुकानाची वेळोवेळी तपासण्या करण्यासाठी अन्न औषध प्रशासनाकडून ज्यादा पथके नेमण्यात येणार आहेत. चंद्रभागा नदी पात्रातील होडी चालकांना भाविकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी लाइफ जॅकेट देण्यात येणार आहेत. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी कोणत्याही भाविकांनी पैसे देऊ नयेत. दर्शन निशुल्क असल्याबाबतचे फलक दर्शनी भागात लावावेत. अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी दिल्या.
अधिकमासातील कमला एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी चार ते पाच लाख वारकरी भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समिती मार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा बाबतची जिल्हाधिकारी यांनी माहिती घेतली. वेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी अधिक मासानिमित्त वारकरी भाविकांच्या सोयी सुविधेसाठी दर्शन रांग दर्शन मंडप येथे करण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली तसेच मंदिर जतन व संवर्धन आराखड्याअंतर्गत पूर्ण झालेल्या व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली.
Gokul Sugar factory: रस्त्यावर पेटली चूल, डाळ-भात शिजवून ठिय्या; ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक






