तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लाळ खुरकत विषाणू संसर्गामुळे प्राण्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी होते, तसेच पावसाळी प्रतिकूल हवामानामुळे त्यांना ताण येतो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असते. मात्र, पुणे महानगरपालिकेने वेळीच उपाययोजना केल्यामुळे हा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात यश आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, बाधित प्राण्यांची प्रकृती सुधारत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
Big Breaking: पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 15 हरणांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट
गेल्या काही दिवसांत १६ चितळ हरणांचा अचानक मृत्यू झाल्याने ही धोक्याची घंटा ठरली होती. संभाव्य साथीच्या आजाराच्या भीतीने प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट नसले तरी, विषबाधा अथवा संसर्गजन्य आजाराचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात होता. अधिकृत तपासणी अहवाल येईपर्यंत प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय अधिक तीव्र केले आहेत.
7–12 जुलै, 2025 दरम्यान जवळपास 15–16 चितळ मृत्युमुखी पडल्याची बामती उघडकीस आलीहोती. यात 14 मादी व 2 नर चितळ हरणांचा समावेश होता. साथीच्या आजारांवरील (विशेषतः foot‑and‑mouth disease) अथवा खाद्यातून किंवा पाण्यातून विषबाधा झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात होता. त्याचबरोबर, उरलेल्या सर्व चितळांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांचीही वैद्यकीय तपासणी सुरू आहे. मृत प्राण्यांचे ऑर्गन आणि रक्ताचे नमुने बरेली, नागपूर, भुवनेश्वर, भोपाळ, पुणे यांसारख्या विविध ठिकाणी असलेल्या नामांकित प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते.