Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav: शंखनाद, ओंकार जप अन् ‘मोरया’चा गजर; दगडूशेठ गणपती मंडपात ३५ हजार महिलांचे एकत्र अथर्वशीर्ष पठण

Ganeshotsav 2026: कार्यक्रमाच्या प्रारंभी महिलांनी शंखनाद केला. त्यानंतर ओंकार जप आणि गणेशगीताच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. सामूहिक अथर्वशीर्ष पठणानंतर ‘मोरया मोरया दगडूशेठ मोरया’चा जयघोष करण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 15, 2026 | 09:31 PM
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

Follow Us
Follow Us:
  • ३५ हजार महिलांच्या अथर्वशीर्ष पठणाने दगडूशेठ गणपती परिसर दुमदुमला
  • ऋषीपंचमीनिमित्त पारंपरिक वेशात स्त्रीशक्तीचा जागर
  • श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी 
पुणे/Ganeshotsav 2026: ऋषीपंचमीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीसमोर ३५ हजारांहून अधिक महिलांनी एकत्रित अथर्वशीर्ष पठण केले. ‘ओम नमस्ते गणपतये’, ‘मोरया मोरया’च्या जयघोषासह शंखनाद, ओंकार जप आणि अथर्वशीर्ष पठणाने उत्सव मंडप परिसर भक्तिमय झाला. पहाटेपासून महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत स्त्रीशक्तीचा जागर केला. कालपासून गणेशोत्सव सुरू झाला आहे. पुणे शहरात देखील गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. श्रीमान दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी देखील पुणेकरां नी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ट्रस्टच्या १३४ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. उत्सव मंडपासमोरील प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीसमोर झालेल्या या सोहळ्याचे हे ४१ वे वर्ष होते. पावसाचे वातावरण असतानाही मध्यरात्री दोन वाजल्यापासूनच महिलांनी कार्यक्रमासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. पुण्यासह मुंबई, सातारा, कोल्हापूर, लातूर आदी शहरांतूनही महिला सहभागी झाल्या.

Pune Ganeshotsav: ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; पुण्यात मानाच्या गणपतींचे दिमाखात आगमन!

कार्यक्रमाच्या प्रारंभी महिलांनी शंखनाद केला. त्यानंतर ओंकार जप आणि गणेशगीताच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. सामूहिक अथर्वशीर्ष पठणानंतर ‘मोरया मोरया दगडूशेठ मोरया’चा जयघोष करण्यात आला. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांची मोठी गर्दी झाली होती. हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला नमन केले. महाआरतीने सोहळ्याची सांगता झाली.

महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. अर्चना भालेराव आणि प्रा. डॉ. गौरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

पुण्यात मानाच्या गणपतींचे दिमाखात आगमन

ढोल-ताशांचा गजर, सनई-चौघड्याचे मंगल सूर आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात पुण्यातील मानाच्या गणपतींसह प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रींचे सोमवारी थाटात आगमन झाले. आगमन मिरवणुकांनंतर ठरलेल्या वेळेनुसार प्राणप्रतिष्ठापना सोहळे पार पडले. त्यामुळे पुण्याच्या मध्यवर्ती भागात दिवसभर गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला.

Pune Ganeshotsav 2026: ४ अप्पर आयुक्त, १४ उपायुक्त अन् १००-हो गार्ड्स; गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा मास्टर प्लॅन

पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती यांच्या १३४व्या वर्षाच्या उत्सवाला सकाळी ९ वाजता रास्ता पेठेतील पॉवर हाऊस चौकातून निघालेल्या मिरवणुकीने सुरुवात झाली. प्रभात बँड, ज्ञानप्रबोधिनी, शौर्य आणि संघर्ष पथक सहभागी झाले. सकाळी ११.४५ वाजता वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे गुरुजी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

Web Title: 35000 women atharvashirsha in premises of shrimant dagdusheth halwai ganpati temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 09:31 PM

Topics:  

  • dagdusheth halwai
  • Ganeshotsav 2026
  • pune ganpati

संबंधित बातम्या

Digestion Health: गणेशोत्सवात जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने पोटाचा होऊ शकतो त्रास, पचनाचे आरोग्य महत्त्वाचे
1

Digestion Health: गणेशोत्सवात जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने पोटाचा होऊ शकतो त्रास, पचनाचे आरोग्य महत्त्वाचे

Ganeshotsav 2026: ढोल-ताशांचा गजर अन् डीजेच्या दणक्यावर पोलिसांची नजर; २०० ठिकाणी मोजली जाणार ध्वनी पातळी
2

Ganeshotsav 2026: ढोल-ताशांचा गजर अन् डीजेच्या दणक्यावर पोलिसांची नजर; २०० ठिकाणी मोजली जाणार ध्वनी पातळी

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन
3

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन

Prasad Home Delivery : लांब रांगेत उभं राहणं विसरा; घरबसल्या मिळवा  Dagdusheth, Siddhivinayakचा प्रसाद! ‘या’ ॲपवरून ऑर्डर करा
4

Prasad Home Delivery : लांब रांगेत उभं राहणं विसरा; घरबसल्या मिळवा Dagdusheth, Siddhivinayakचा प्रसाद! ‘या’ ॲपवरून ऑर्डर करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.