Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

राष्ट्रवादीकडे बहुमताचा आकडा असल्याने पुरंदरच्या पंचायत समितीवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार आहे हे आता निश्चित झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 14, 2026 | 12:30 AM
राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

Follow Us
Close
Follow Us:
  • राजकीय घडामोडींना वेग
  • पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा
  • राष्ट्रवादी आणि भाजपची युती होण्याची शक्यता
सासवड : राज्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता पंचायत समितीचा सभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान पुरंदरला पंचायत समिती मधील एकूण आठ सदस्यांपैकी तब्बल चार सदस्य राष्ट्रवादीचे असून, शिवसेनेचे दोन तसेच भाजपचे दोन सदस्य निवडून आले आहेत. राष्ट्रवादीकडे बहुमताचा आकडा असल्याने पंचायत समिती सभापती राष्ट्रवादीचाच होणार असून, पुरंदरच्या पंचायत समितीवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार आहे हे आता निश्चित झाले आहे.

 

पुरंदर पंचायत समिती निवडणुकीत आठ पैकी चार गणात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये दिवे गणातून अमित भाऊसाहेब झेंडे, गराडे गणातून अर्चना ज्ञानेश्वर कटके, नीरा शिवतक्रार गणातून मोनिका स्वप्नील कांबळे तसेच कोळविहीरे गणातून स्मिता संतोष निगडे हे चौघेजण निवडून आले आहेत. तसेच बेलसर गणातून माणिक बाळासो निंबाळकर आणि वीर गणातून प्रवीण बाळासाहेब जगताप हे दोघे सदस्य शिवसेनेचे त्याचप्रमाणे भिवडी गणातून सायली मनोज शिंदे आणि माळशिरस गणातून माऊली यादव हे दोघे भाजपचे सदस्य निवडून आले आहेत.

पक्षीय बलाबल पाहता आठ पैकी चार सदस्य एकट्या राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांच्याकडे बहुमत आहे. पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण सोडत पाहता दिवे गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित आहे. गराडे गणात सर्वसाधारण महिला, नीरा शिवतक्रार गणात अनुसूचित जाती स्त्री तर कोळविहीरे गणात सर्वसाधारण स्त्री याप्रमाणे आरक्षण आहे. बेलसर, माळशिरस आणि वीर गणात सर्वसाधारण साठी आरक्षित असून, भिवडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण आहे. दरम्यान सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव आहे. हा प्रवर्ग पंचायत समितीच्या दिवे गणात आरक्षित झालेला असून, याच गणातून राष्ट्रवादीचे अमित झेंडे निवडून आले आहेत. त्यामुळे अमित भाऊसाहेब झेंडे यांच्या सभापती पदाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.

राष्ट्रवादी आणि भाजपची युती होण्याची शक्यता.

पुरंदर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीकडे बहुमत असून, सभापती पद राष्ट्रवादीकडेच जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर शिवसेना आणि भाजप विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहेत. मात्र आगामी काळातील राजकीय समीकरणे पाहता राष्ट्रवादीला भाजपची गरज पडणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदरचे कॉंग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांना बरोबर घेऊन सोमेश्वर साखर कारखाना, खरेदी विक्री संघ, नीरा बाजार समिती आणि पुणे जिल्हा बँक अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता स्थापन केली आहे.

दरम्यान आता संजय जगताप भाजपमध्ये असले तरी पक्षीय भाग वगळता जगताप यांचे राष्ट्रवादी बरोबर राजकीय संबंध सलोख्याचे राहिले आहेत. काही दिवसात पुरंदर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती च्या निवडणुका येत आहेत. त्यानंतर काही कालावधीत खरेदी विक्री संघ, नीरा बाजार समिती, जिल्हा बँकेच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहेत. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी आणि पूर्वीचे कॉंग्रेस व आताचे भाजप यांची सत्ता आहे. तसेच पुढील काळात हेच समीकरण ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला भाजपची गरज पडणार आहे. त्या बदल्यात भाजपला उपसभापती पद मिळू शकते. तसेच भाजपचे दोन सदस्य असल्याने दोन्ही सदस्यांना उपसभापती पदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळण्याची शक्यता आहे.

अमित झेंडे यांनी पूर्वीच्या निवडणुकीत हार पत्करली आहे. मात्र त्याच जिद्दीने सक्रीय राहून त्यांनी दिवे गावचे सरपंच म्हणून काम केले आहे. त्यांच्या भावजई रुपाली अमोल झेंडे याही जिल्हा परिषद निवडणुकीत दिवे गराडे गटातून विजयी झाल्या आहेत. तसेच अमित झेंडे यांची संयमी, अभ्यासक आणि पक्षासाठी झोकून देवून काम करणारा कार्यकर्ता अशी ओळख असून युवकांचा मोठा संच आहे. पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला पक्ष वाढीसाठी त्यांचा मोठा उपयोग होणार आहे. तसेच आगामी निवडणुकांचा दृष्टीनेही अमित झेंडे यांच्या सभापतीपदाच्या निवडीला महत्व दिले जात आहे.

Web Title: 4 candidates from ajit pawars ncp have been elected in the purandar panchayat samiti elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Purandar
  • Purandar News

संबंधित बातम्या

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?
1

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

पुरंदर तालुक्यात गॅस वितरण व्यवस्थेचा बोजवारा, वशिलेबाजांना प्राधान्य; सामान्य नागरिक मात्र रांगेत उभा
2

पुरंदर तालुक्यात गॅस वितरण व्यवस्थेचा बोजवारा, वशिलेबाजांना प्राधान्य; सामान्य नागरिक मात्र रांगेत उभा

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?
3

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.