Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

येलवाडीत 85 टक्के मतदान; सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

खेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 08, 2026 | 02:40 PM
येलवाडीत 85 टक्के मतदान; सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

येलवाडीत 85 टक्के मतदान; सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

Follow Us
Follow Us:

देहूगांव / बद्रीनारायण घुगे : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण २०२६ साठी शनिवार (ता.7) रोजी झालेली सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया येलवाडी परिसरात अत्यंत शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडली. कुठलाही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया सुरळीतरीत्या पूर्ण झाली.

खेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. मतदारांनी मोठ्या उत्साहाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजावला कान्हेवाडी तर्फे चाकण – ८५४, सांगुर्डी – १०९७, येलवाडी – २९३२, खालुंब्रे – १६४१, म्हाळुंगे – २८४०, सावरदरी – १०१६, वासुली – ८१२, शिंदे – १३१४, नानेकरवाडी – ३२४०, खराबवाडी – ४३१०, बिरदवडी – ११११ अशा एकूण २१,०६७ मतदारांनी मतदान करून सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले. येलवाडी गणात सुमारे ८५ टक्के मतदान नोंदविले गेले.

खेड तालुका जिल्हा परिषद गणासाठी :

१) जीवन खराबी (मशाल – उबाठा),
२) गणेश नाणेकर (धनुष्यबाण – शिंदे गट)
३) गणेश बोत्रे (घड्याळ – अजित पवार गट)
हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

तर पंचायत समिती गणासाठी

१) अर्चना नितीन गाडे (धनुष्यबाण – शिंदे गट),
२) अश्विनी सोमनाथ तरस (घड्याळ – अजित पवार गट)
३) दीपाली अमित बवले (मशाल – उबाठा)
या तीन महिला उमेदवारांनी आपले नशीब आजमावले.

अनुभवी मतदारांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, खेड तालुक्यातील आठ जागांपैकी शिवसेना (शिंदे गट) – १, शिवसेना (उबाठा) – १, भाजप – २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ४ अशी विजयी उमेदवारांची बलाबल स्थिती राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषद गणात जीवन खराबी (मशाल) आणि गणेश बोत्रे (घड्याळ) यांच्यातच खरी अटीतटीची लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तर पंचायत समिती गणात अश्विनी तरस आणि दीपाली बवले यांच्यात प्रमुख चुरस असून, सध्याच्या स्थितीत अश्विनी तरस यांचे पारडे जड मानले जात आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : अंबरनाथमध्ये राजकारणाचा डाव; कॉंग्रेस उमेदवारांवर भाजपचा प्रभाव

Web Title: 85 percent voter turnout in yelwadi result will be declared tommorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Election News
  • Voting Day

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.