Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हा बँक निवडणुकीत महेश शिंदे ठरले ‘बाजीगर’; राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज

आमदार महेश शिंदे यांच्याकडे ३३ मतांची ताकद असतानाही त्यांनी प्रतिस्पर्ध्याच्या गटातील तब्बल ११ मते आपल्या बाजूने वळवून सुनील खत्री यांना ४४ मतांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे त्यांची एकाकी झुंज चर्चेत आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 14, 2026 | 02:04 PM
जिल्हा बँक निवडणुकीत महेश शिंदे ठरले ‘बाजीगर’; राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज

जिल्हा बँक निवडणुकीत महेश शिंदे ठरले ‘बाजीगर’; राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा बँक निवडणुकीत महेश शिंदे ठरले ‘बाजीगर’
  •  राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज
  • ३३ मतांची ताकद, ४४ पर्यंत मजल
कोरेगाव/संजय कदम : कोरेगाव सोसायटी गटामध्ये जिल्हा बँक निवडणूक सुनील खत्री व सुनील माने यांच्यामध्ये अतिशय अटीतटीची टक्कर झाली. ९० पैकी राष्ट्रवादीकडे ५७ ते ५८ मते असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय फिक्सच असल्याचे बोलले जात होते. भाजप, आमदार महेश शिंदे यांच्याकडे एकूण ३३ मते होती. आमदार महेश शिंदे यांच्याविरोधात महाआघाडीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन काका पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आदी दिग्गज नेते कार्यकर्त्यांची फौज असतानाही त्यांनी एकाकी झुंज देत प्रतिस्पर्ध्याच्या छावणीत घुसून त्यांनी आपले उमेदवार सुनील खत्री यांना ४४ या जादुई आकड्यापर्यंत पोहोचवले, हे काही कमी नाही. त्यामुळे अभिनेता शहारूक खानच्या बाजीगर चित्रपटातील हार कर जितने वालो को बाजीगर कहते है अशी  भूमिका महेश शिंदे यांची झाली आहे.

 

यापुढील निवडणुकीतही महेश शिंदे यांना प्रतिस्पर्ध्यासह, स्वकीयांचा सामना करावा लागणार आहे, हे या निवडणुकीत स्पष्ट झाले. प्रतिस्पर्ध्याच्या तंबुतील तब्बल अकरा मते फोडून लढाई बरोबरीला महेश शिंदे यांनी आणल्याने चिठ्ठीवर विजयी झालेल्या राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज असल्याचेही आता बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत महेश शिंदे यांना कोरेगाव तालुक्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीतही महेश शिंदे विरोधी सर्वजण असे राजकीय स्वरूप होते. विरोधकांनी हाच कित्ता जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीतही गिरवत यश संपादन केले असले तरी महेश शिंदे यांनी हम भी किसीसे कम नहीं असे म्हणत आपल्याकडे ३३ मतांची बेरीज असतानाही आपले समर्थक सुनील खत्री यांना दुसरीवेळ बँकेच्या निवडणुकीत उतरवले.

गेल्या वेळी राष्ट्रवादीतील फुटीमुळे निवडणुकीचा निकाल चिठ्ठीवर येऊन सुनील खत्री यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्यामुळे शिवाजीराव महाडिकांचा पराभव झाला होता. हीच वेळ सुनील माने यांच्यावर आली. परंतु सुनील मानेना यावेळी नशिबाने साथ दिल्याने ते जिंकले. चिठ्ठीने विजय दिलेल्या सुनील खात्री यांची नशिबाने साथ सोडल्याने चिठ्ठीने त्यांचा पराभव केल्याचे स्पष्ट झाले. गेल्यावेळी सुनील खत्री विरुद्ध शिवाजीराव महाडीक अशी निवडणूक झाली होती. त्यावेळी महेश शिंदे हे नवखे होते. अनुभव पाठीशी नव्हता. त्यावेळी २२ ते २५ मतांची बेरीज असताना सुनील खत्री ४५ मतांपर्यंत पोहोचले. विरोधात असलेल्या शिवाजीराव महाडिकांना तेवढीच मते मिळाली. परंतु त्यावेळी राष्ट्रवादीतील फुटीचा फायदा व नशिबाचा फायदा सुनील खत्रीना झाला होता. यावेळी मात्र ज्यांनी गेल्या निवडणुकीत मदत केली ती पार्टीच समोर आल्यामुळे सुनील खत्री यांच्या मनात निवडणुकीच्या सुरुवातीपासून पराभवाची पाल चुकचुकत होती. तरीही महेश शिंदे यांच्यासारखे कणखर नेतृत्व सोबत असल्यामुळे ते डगमगले नाहीत.

हे सुद्धा वाचा : ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर…’; तरुणाची तरुणीला धमकी; शिवीगाळ करत मारहाण

शिवसेना, काँग्रेसची मते निर्णायक ठरली

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटल्याचे स्पष्ट झाले. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) २, काँग्रेसने १ मत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील माने यांना दिले असल्याची सध्या चर्चा आहे. ही दोन्ही मते विजयासाठी निर्णायक ठरल्याचीही सध्या चर्चा आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोरेगाव सोसायटी गटातील जिल्हा बँक निवडणुकीत कोणामध्ये लढत झाली?

    Ans: कोरेगाव सोसायटी गटात सुनील खत्री आणि सुनील माने यांच्यात अटीतटीची लढत झाली.

  • Que: महेश शिंदे यांच्या भूमिकेची चर्चा का होत आहे?

    Ans: आमदार महेश शिंदे यांच्याकडे ३३ मतांची ताकद असतानाही त्यांनी प्रतिस्पर्ध्याच्या गटातील तब्बल ११ मते आपल्या बाजूने वळवून सुनील खत्री यांना ४४ मतांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे त्यांची एकाकी झुंज चर्चेत आली आहे.

  • Que: निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसची मते निर्णायक ठरली का?

    Ans: चर्चेनुसार, शिवसेना (शिंदे गट)ची दोन आणि काँग्रेसचे एक मत सुनील माने यांच्या बाजूने गेले. ही तीन मते विजयासाठी निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Mla mahesh shinde has achieved a major success in the district bank elections nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • Election News
  • MLA Mahesh Shinde
  • Satara

संबंधित बातम्या

३५व्या किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महाबळेश्वरमध्ये बालचमूंच्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती
1

३५व्या किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महाबळेश्वरमध्ये बालचमूंच्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती

Mahabaleshwar News: पालकमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले! महाबळेश्वर बाजारपेठ पुन्हा अतिक्रमणांच्या विळख्यात
2

Mahabaleshwar News: पालकमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले! महाबळेश्वर बाजारपेठ पुन्हा अतिक्रमणांच्या विळख्यात

Maharashtra Open : महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेत मानांकितांचा धडाका; विनय पाटील, हर्षित महिमकर विजयी
3

Maharashtra Open : महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेत मानांकितांचा धडाका; विनय पाटील, हर्षित महिमकर विजयी

Shivendrasinhraje Bhosale: ‘माझी वंशावळ सांगायची आणि तत्त्वज्ञान शिकवण्याची गरज नाही’; शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांना टोला
4

Shivendrasinhraje Bhosale: ‘माझी वंशावळ सांगायची आणि तत्त्वज्ञान शिकवण्याची गरज नाही’; शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.