हर्षवर्धन पाटील यांच्या त्या वक्तव्यावरून उजनी पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांची नाराजी
इंदापूर: भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अखेर आज (07 ऑक्टोबर) हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या कन्या अंकिता पाटील आणि कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. इंदापूरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांच्यासह त्यांची कन्या आणि चिंरजीव अंकिता पााटील, राजवर्धन पाटील आणि त्यांच्या इतर कार्यकर्त्यांचाही पक्षप्रवेश कऱण्यात आला. यावेळी स्वत: शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत प्रवेश करताच शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना मोठे गिफ्ट दिले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांची इंदापुरातून विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजपमध्ये असताना हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार, ही जागा अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याने ती जागा मिळणेही शक्य नव्हते. त्यातच इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत.
हेही वाचा: एअर शो पाहण्यासाठी मरीना बीचवर जमली लाखोंची गर्दी; पाच जणांचा मृत्यू; अनेकांची प्रकृती खालावली
यावेळी बोलताना, जयंत पाटील म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारी जाहीर केली आहे. आता इंदापूरचा निकाल काय लागेल? हे आताच जाहीर झालं आहे. 2019 पासून आमचे काही नेते सोडून जात होते. अबकड गेले तरी चालतील पण आमच्याकडे शरद पवार आहेत. दिल्लीतून शरद पवार साहेबांना नमवण्याचा सातत्याने प्रयत्न होत असतो. पवार साहेबांंना मोडल्यावर महाराष्ट्र मोडता येईल असे दिल्लीला वाटत असते. पण हर्षवर्धन पाटील आमच्याकडे आले आहेत. आधी आमच्याकडे खूप गर्दी होती. पण आता ती कमी झाली आहे.
हेही वाचा: पाचगणी भाजी मार्केटला भीषण आग; तब्बल ‘इतक्या’ लाखांचे नुकसान