Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बालकांच्या कुपोषणाचे अचूक मोजमाप होणार; कुपोषणाचे प्रमाण समजून उपाययोजना होणार सोपी

नव्या पद्धतीत बालकांचे नऊ गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये सामान्य वाढ असलेली बालके, उंचीच्या तुलनेत कमी वजन, जादा वजन किंवा स्थूलता अशा विविध स्थितींचा समावेश आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 14, 2026 | 03:29 PM
बालकांच्या कुपोषणाचे अचूक मोजमाप होणार

बालकांच्या कुपोषणाचे अचूक मोजमाप होणार

Follow Us
Follow Us:

पुणे : बालकांमधील कुपोषणाचे नेमके प्रमाण, त्याचे विविध प्रकार आणि प्रत्येक बालकाची पोषणस्थिती अधिक अचूकपणे समजून घेण्यासाठी राज्यात नवी वर्गीकरण पद्धत विकसित करण्यात आली आहे. ‘डबल बर्डन इंडेक्स ऑफ मालन्यूट्रिशन’ (डीबीआय-पीएनजीआर) असे या पद्धतीचे नाव आहे. या पद्धतीमुळे कुपोषित बालकांची दुबार नोंद टाळून त्यांची एकूण संख्या निश्चित करण्यास मदत होणार आहे.

तसेच, बालकांच्या गरजेनुसार उपचार आणि अंगणवाडी स्तरावर पोषणविषयक उपाययोजनांचे नियोजन करणे शक्य होणार आहे. संयुक्त राष्ट्र बालनिधी (युनिसेफ), महाराष्ट्र इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (महा आयएपी), राज्याचा आरोग्य विभाग आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या सहकार्याने ही पद्धत विकसित करण्यात आली आहे. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचे संशोधन करण्यात आले.

Weather Update : ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा कमी होणार; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

सध्या बालकांचे वय, वजन आणि उंची यांची मोजणी करून त्यांच्या वाढीचे मूल्यमापन केले जाते. मात्र, एकाच बालकाला उंची कमी असणे, वजन कमी असणे किंवा वाढ खुंटणे अशा एकापेक्षा अधिक समस्या असू शकतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारांतील बालकांची संख्या मोजताना दुबार नोंद होण्याची शक्यता असते.

नऊ गटांत वर्गीकरण

नव्या पद्धतीत बालकांचे नऊ गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये सामान्य वाढ असलेली बालके, उंचीच्या तुलनेत कमी वजन, जादा वजन किंवा स्थूलता अशा विविध स्थितींचा समावेश आहे.

संशोधनात सहभागी बालरोगतज्ज्ञ

बालरोगतज्ज्ञ डॉ. मृदुला फडके, युनिसेफच्या पोषणतज्ज्ञ राजलक्ष्मी नायर, युनिसेफचे सल्लागार गगन गौतम आणि छाया राडे यांनी गेल्या तीन वर्षांपासून या पद्धतीच्या विकासासाठी काम केले. डॉ. उदय बोधनकर, डॉ. यशवंत पाटील, डॉ. उपेंद्र किजवाडेकर, डॉ. संजीव जोशी, डॉ. संजय प्रभु, डॉ. अंजली ओटीव आणि डॉ. प्रमिला मेनन हे या संशोधनात सहभागी झाले.

१९.९ टक्के बालकांची उंची वयाच्या तुलनेत कमी

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील १९.९ टक्के बालकांची उंची वयाच्या तुलनेत कमी आहे. तर २९.५ टक्के बालकांचे वजन उंचीच्या तुलनेत कमी असून, ३१.४ टक्के बालकांचे वजन वयाच्या तुलनेत कमी आहे. राज्यात जादा वजन किंवा स्थूलता असलेल्या बालकांचे प्रमाण १.५ टक्के आहे.

Web Title: Accurate measurement of child malnutrition will be carried out nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 03:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.