Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी…

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025–26 साठी दिनांक 09/02/2026 रोजी होणाऱ्या मतमोजणीची संपूर्ण व काटेकोर तयारी प्रशासनातर्फे पूर्ण करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2026 | 04:13 PM
मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी...

मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी...

Follow Us
Follow Us:
  • मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
  • टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके
  • तर EVM साठी 20 पथके कार्यरत
वडगाव मावळ/ सतिश गाडे : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025–26 साठी दिनांक 09/02/2026 रोजी होणाऱ्या मतमोजणीची संपूर्ण व काटेकोर तयारी प्रशासनातर्फे पूर्ण करण्यात आली आहे. सदर मतमोजणी सकाळी 10 वाजता नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय मावळ येथे सुरू होणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.

 

मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण 25 प्रशिक्षित पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये टपाली मतपत्रिका मोजणीसाठी 5 पथके तर इव्हीएम मतमोजणीसाठी 20 पथके कार्यरत राहणार आहेत. एकूण 17 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण केली जाणार असून, प्रत्येक फेरीची माहिती ध्वनीक्षेपणाद्वारे वेळोवेळी जाहीर केली जाणार आहे. यामुळे उमेदवार, प्रतिनिधी तसेच उपस्थितांना प्रक्रियेबाबत सातत्याने अद्ययावत माहिती मिळणार आहे.

प्रशासनाने मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. केवळ अधिकृत पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही निरीक्षण तसेच प्रवेश-निर्गमनावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही अनुचित प्रकारास प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

याबाबत माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी सांगितले की, “मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि नियमानुसार पार पडावी यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. सर्व पथकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून, मतमोजणीदरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस तत्काळ प्रतिसाद देण्याची तयारी आहे.”

दरम्यान, मतमोजणीच्या फेऱ्यांचे वेळापत्रक तसेच टपाली व ईव्हीएम मतांची मोजणी स्वतंत्रपणे व नियोजित क्रमाने करण्यात येणार असल्याने निकालांची घोषणा टप्प्याटप्प्याने अपेक्षित आहे. नागरिकांनी व संबंधितांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : उत्सुकता शिगेला! दौंड तालुक्याचे मोजणीकडे लक्ष; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

मावळ तालुक्यात मतदानाचा टक्का समाधानकारक

मावळ तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदानाची टक्केवारी चांगली झाल्यामुळे प्रशासनासह राजकीय वर्तुळात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासांत मतदानाचा वेग काहीसा मंद होता. मात्र दुपारच्या सत्रात मतदारांचा ओघ वाढल्याचे चित्र दिसून आले. ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रांवर शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रथमच मतदान करणाऱ्या युवक-युवतींमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.

Web Title: Administration ready for counting of votes for zilla parishad and panchayat samiti elections in maval taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • maval news
  • Maval Politics
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
1

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.