Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदे अद्याप रिक्तच; सत्ता स्थापनेनंतर दोन पदे वाढण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताना महापालिकेतील रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे या तिन्ही अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या झाल्या. तर पृथ्वीराज बी. पी. यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 03, 2024 | 09:49 PM
पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदे अद्याप रिक्तच; सत्ता स्थापनेनंतर दोन पदे वाढण्याची शक्यता

पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदे अद्याप रिक्तच; सत्ता स्थापनेनंतर दोन पदे वाढण्याची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाची तीन पदे मंजुर आहेत. मात्र, गेल्या नऊ महिन्यापासून यातील दोन पदे रिक्त असल्याने प्रशासनाचे काम कोलमडले आहे. मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना एका अतिरिक्त आयुक्ताकडच्या खात्यांचा अतिरिक्त पदभार सांभाळावा लागत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उठली असली तरीही राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्त दिलेले नाहीत. त्यामुळे राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या संभाव्य बदल्यांमध्ये पुणे मनपाला दोन अतिरिक्त आयुक्त मिळण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद महत्त्वाचे असून, येथे काम करण्यासाठी अनेक आयएएस अधिकारी मंत्रालयातून तसेच राजकीय नेत्याकडे जाऊन वशिला लावत असतात. येथील जागी रिक्त झाल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा होती, पण कोणाचीही नियुक्ती झाली नाही. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा कोणत्या पक्षाची सत्ता येईल याची खात्री नव्हती. त्यामुळे वशिल्याच्या अधिकाऱ्यांनी नवीन सरकार आल्यास त्यांचा त्रास नको म्हणून पुणे महापालिकेत बदली न करून घेण्यास नापसंती दर्शविली.

आता विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महायुतीची सत्ताही कायम राहिली आहे. नवीन सरकारचा शपथविधी उरकल्यानंतर नवीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील. त्यामध्ये पुणे महापालिकेत कोणाची वर्णी लागणार हे पाहावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उठली असली तरीही राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्त दिलेले नाहीत. पुणे महापालिकेत सुमारे ५२ विभाग, १५ क्षेत्रीय कार्यालय, पाच परिमंडळ कार्यालय, सुमारे १७ हजार कर्मचारी असा मोठा पसारा आहे. येथील कामाचा ताण जास्त असल्याने आयुक्तांसह तीन अतिरिक्त आयुक्त पद निर्माण केले आहेत. त्यातील एका जागेवर महापालिकेच्या सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्याची बढतीने नियुक्ती होते. जर शासनाला या पदासाठी योग्य व्यक्ती न मिळाल्यास तेथे आयएएस दर्जाचाही अधिकारी नियुक्त करता येतो.

दोघांवर कामांचा ताण

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताना महापालिकेतील रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे या तिन्ही अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या झाल्या. तर पृथ्वीराज बी. पी. यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. गेल्या नऊ महिन्यांपासून दोन जागा रिक्त असल्याने आयुक्त भोसले आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. या दोघांवर कामाचा ताण निर्माण झाला आहे.

चार ते पाच विभागांची जबाबदारी आयुक्तांकडे
पथ, भूसंपादन, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलन, पाच पैकी तीन परिमंडळ यासह अन्य विभागांची जबाबदारी थेट आयुक्तांकडे आली आहे. आयुक्तांच्या सवडीनुसार संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना विविध विकास कामांवर चर्चा, निर्णय करावे लागत आहेत.तर पृथ्वीराज बी. पी. यांनाही दैनंदिन कामाचा मोठा ताण निर्माण होत असल्याने नवीन काम सुचविणे, प्रकल्प आणणे यावर काम करण्यासाठी वेळ मिळत नसल्याची स्थिती आहे.दरम्यान, आयुक्त भोसले यांनी अतिरिक्त आयुक्त पदाच्या जागेवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्याचे सांगितले.

Web Title: After mahayuti government oath ceremony chance to two additional commissioner for pune carporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 09:49 PM

Topics:  

  • Pune
  • Rajendra Bhosale

संबंधित बातम्या

राज्याचा कला, परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन 
1

राज्याचा कला, परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन 

Pune News: पंचायत समितीमध्ये ‘महिलाराज’; पुणे जिल्ह्यातील १३ पैकी ७ ठिकाणी…
2

Pune News: पंचायत समितीमध्ये ‘महिलाराज’; पुणे जिल्ह्यातील १३ पैकी ७ ठिकाणी…

Pune Crime: पुणे हादरलं! प्रियकराच्या मारहाणीला कंटाळून प्रेयसीनं भावासोबत मिळून केला खून; मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळला
3

Pune Crime: पुणे हादरलं! प्रियकराच्या मारहाणीला कंटाळून प्रेयसीनं भावासोबत मिळून केला खून; मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळला

Pune News: राज्यात नवीन GR नुसार प्राध्यापक भरती; पारदर्शकतेसह गुणवत्तेला प्राधान्य
4

Pune News: राज्यात नवीन GR नुसार प्राध्यापक भरती; पारदर्शकतेसह गुणवत्तेला प्राधान्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.