Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: “वंशाला दिवा हवा” म्हणत गर्भपातास भाग पाडले; हुंड्यासाठी 25 लाख, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

“वंशाला दिवा हवा, मुलगी नको” म्हणत विवाहितेवर गर्भपाताचा दबाव टाकण्यात आला. गाडी न दिल्याने 25 लाखांची हुंड्याची मागणी झाली. सातत्याने मानसिक-शारीरिक छळ सहन न झाल्याने पुण्यात विवाहितेने आत्महत्या केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 26, 2026 | 10:43 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:
  • मुलगी नको म्हणत गर्भपाताचा दबाव व छळ
  • गाडी न दिल्याने 25 लाख रुपयांची हुंडा मागणी
  • आत्महत्येनंतर पतीसह सासरच्या चौघांना अटक
पुणे: पुणे जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सासरच्या मंडळींनी “आमच्या वंशाला दिवा हवा, मुलगी नको,” असे म्हणत पाच महिन्यांच्या गर्भातील बाळाचा जबरदस्ती गर्भपात करवून घेतला, एवढेच नाही तर ह्युंड्यासाठी २५ लाख रुपये मागितले. लग्नाच्या अवघ्या काही महिन्यातच मानसिक व शारीरिक आणि आर्थिक छळाला सुरुवात झाली. या सगळ्याला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली. ही घटना उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Latur News: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई; पुण्यातील खून प्रकरणातील 5 आरोपींना लातुरात अटकेत

काय नेमकं प्रकरण?

आत्महत्या जाणाऱ्या महिलेचे नाव दीप्ती मगर असे आहे. दीप्तीचा विवाह रोशन चौधरी याच्याशी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी झाला होता. दोन्ही कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. लग्नाच्या काही महिन्यांतच पती रोशन याने दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. “तू माझ्या रूपाला साजेशी नाहीस, तुला घरकाम येत नाही,” अशा अपमानास्पद शब्दांत तो दीप्तीचा सातत्याने मानसिक छळ करत होता.

पाच वर्षांनंतर झाली मुलगी मात्र…

लग्नाच्या पाच वर्षानंतर दीप्ती आणि रोशनला बाळ झालं. त्यांना मुलगी झाल्याने सासरच्या मंडळींनी नाराजी व्यक्त केली. डिलिव्हरीनंतर दीप्ती सासरी नांदायला गेल्यावर व्यवसाय अडचणीत असल्याचे कारण दिले. आणि माहेरून पैसे आन अशी मागणी केली. दिप्तीने आपल्या माहेरून १० लाख रुपये दिले. त्यानंतर “लग्नात गाडी दिली नाही” या कारणावरून पुन्हा 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानुसार दीप्तीच्या माहेरच्यांनी रोख स्वरूपात रक्कम २५ लाख दिले.

दिप्तीला लग्नात मिळालेले २५ तोळे सोन्याचे दागिने सुरक्षिततेच्या कारणास्तव सासू-सासऱ्यांनी स्वतःकडे ठेवले होते. मात्र पुढे एका कार्यक्रमासाठी दागिने मागितले असता, ते नवीन व्यवसायासाठी गहाण ठेवल्याचे सांगण्यात आले.

गर्भात मुलगी असल्याचे समजताच…

ऑक्टोबर २०२५ मध्ये दीप्तीची सासू ही सरपंच झाली. त्यांनतर पुन्हा पैश्यांची मागणी करण्यात आली. मात्र यावेळी दिप्तीने नकार दिला. तेव्हा सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दीप्ती गर्भवती असतांना गर्भलिंग तपासणीसाठी दबाव टाकण्यात आला. पाच महिन्यांच्या गर्भात मुलगी असल्याचे निदान होताच त्यांनी जबरदस्ती सिझेरियनद्वारे गर्भपात करवून घेतला. एवढेच नाही तर दीप्तीच्या नावावर असलेली जमीन आणि फार्महाउस विकण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. असे गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आले आहे.

या सततच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळामुळे दीप्ती नैराश्यात गेली. २४ तारखेला तिने या सगळ्याला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी दीप्तीच्या आई सौ. हेमलता बाळासाहेब मगर (रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. उरुळी कांचन पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडाबळी तसेच गर्भलिंग तपासणी व गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या चार जणांचे नाव

रोहन कारभारी चौधरी (पती), सुनिता कारभारी चौधरी (सासू – सरपंच, सोरतापवाडी), कारभारी चौधरी (सासरे) आणि रोहित कारभारी चौधरी (दीर) असे आहे. हे सर्व आरोपी सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे येथील रहिवासी आहेत.

Mumbai Crime: मालाडनंतर भांडुपमध्ये रक्तरंजित हल्ला,भररस्त्यात 29 वार करत कुख्यात गुंडाला संपवलं; परिसरात भीती

💡

Frequently Asked Questions

  • Que: विवाहितेवर कोणत्या कारणांवरून छळ करण्यात आला?

    Ans: मुलगी नको म्हणून गर्भपाताचा दबाव आणि हुंड्याच्या पैशांसाठी छळ.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी कोणावर कारवाई केली?

    Ans: पती, सासू, सासरे आणि दीर अशा चौघांना अटक करण्यात आली.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत.

Web Title: Pune crime forced to have an abortion for wanting a male heir demanded 25 lakh rupees as dowry the married woman took an extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: मालाडनंतर भांडुपमध्ये रक्तरंजित हल्ला,भररस्त्यात 29 वार करत कुख्यात गुंडाला संपवलं; परिसरात भीती
1

Mumbai Crime: मालाडनंतर भांडुपमध्ये रक्तरंजित हल्ला,भररस्त्यात 29 वार करत कुख्यात गुंडाला संपवलं; परिसरात भीती

Latur News: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई; पुण्यातील खून प्रकरणातील 5 आरोपींना लातुरात अटकेत
2

Latur News: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई; पुण्यातील खून प्रकरणातील 5 आरोपींना लातुरात अटकेत

Jalgaon Accident: जळगावात भीषण अपघात: ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या धडकेत आजोबा व 6 वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू
3

Jalgaon Accident: जळगावात भीषण अपघात: ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या धडकेत आजोबा व 6 वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू

Beed Crime: पत्नीवर संशय, काठीने केली बेदम मारहाण; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा केला बनाव
4

Beed Crime: पत्नीवर संशय, काठीने केली बेदम मारहाण; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा केला बनाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.