Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Accident: हिंजवडीत माणुसकी जिंकली! भरधाव ट्रकने चिरडलेल्या 14 वर्षीय मुलाचा आयटी कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे जीव वाचला

हिंजवडी आयटी पार्कमध्ये जड वाहन बंदी असतानाही भरधाव ट्रकने 14 वर्षीय फुगेविक्रेत्या मुलाला धडक दिली. आयटी कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मुलाला वेळीच रुग्णालयात दाखल करून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 27, 2026 | 03:05 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • हिंजवडीत ट्रकच्या धडकेत अल्पवयीन फुगेविक्रेता गंभीर जखमी
  • आयटी कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मुलाचा जीव वाचला
  • जड वाहन बंदी उल्लंघनप्रकरणी ट्रक चालक ताब्यात
पुणे: पुण्यातून अपघाताची एक बातमी समोर आली आहे. जड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही भरधाव ट्रक रस्त्यावर उतरला आणि क्षणात एका अल्पवयीन फुगेविक्रेत्याचं आयुष्य संकटात आलं. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या धक्कादायक अपघातात 14 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला, मात्र आयटी कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मृत्यूच्या दाढेतून तो बचावला.या घटनेने आयटी कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

काय घडलं नेमकं?

ही घटना रविवारी सकाळी सुमारे दहा वाजता हिंजवाडी परिसरात जड वाहनांना प्रवेशबंदी होती. तरीही एका ट्रकने या परिसरात प्रवेश केला आणि या वेगाने धावणाऱ्या ट्रकने फुगे विकणार्या अल्पवयीन मुलाला जोरदार धडक दिली. या अपघातात मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर तेथून जाणाऱ्या आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने मुलाला आपल्या वाहनातून पिरंगुट येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार नाकारण्यात आले. त्यानंतर सूस परिसरातील रुग्णालयातही जागा उपलब्ध नसल्याने उपचार मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या.

Mumbai: मुंबईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट! मालवणीतील चाळीला आग, 7 जण गंभीर जखमी

अखेर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुलाला पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले. आर्थिक अडचणीमुळे उपचारात विलंब होण्याची शक्यात असतांना फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज (FITE) या संघटनेने पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याशी संपर्क साधला. डॉ. म्हसे यांनी तातडीने संचेती रुग्णालयाचे डॉ. पराग संचेती यांच्याशी चर्चा केली. परदेशात असतानाही डॉ. संचेती यांनी तत्काळ उपचारांचे निर्देश दिले. त्यानंतर मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर उपचार सुरु आहे.

या घटनेची माहिती मिळताच हिंजवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. जड वाहनांवर बंदी असतानाही आयटी पार्क परिसरात वाहन नेल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आयटी कर्मचारी आशुतोष पांडे, प्रशांत पंडित आणि पवनजीत माने यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मुलाचा जीव वाचला असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोल्हापुरात पाच लाखांच्या साड्या जप्त; ZP निवडणुकीत महिला मतदारांना आमिष?

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्क परिसरात.

  • Que: जखमी मुलाची स्थिती कशी आहे?

    Ans: मुलावर संचेती रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे.

  • Que: अपघाताला जबाबदार कोण?

    Ans: जड वाहन बंदी असतानाही परिसरात आलेल्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Pune accident the life of a 14 year old boy who was run over by a speeding truck was saved thanks to the prompt action of an it employee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Accident
  • Pune
  • Pune Accident

संबंधित बातम्या

Pune Crime: मन सुन्न करणारी घटना! वाघोलीत आईकडून ११ वर्षीय मुलाची हत्या; मुलीवरही जीवघेणा हल्ला
1

Pune Crime: मन सुन्न करणारी घटना! वाघोलीत आईकडून ११ वर्षीय मुलाची हत्या; मुलीवरही जीवघेणा हल्ला

मार्केटयार्डात भाजीपाला-फळांच्या दरात चढ-उतार! काकडी, डाळींब व फुलांना बाजारात वाढती मागणी
2

मार्केटयार्डात भाजीपाला-फळांच्या दरात चढ-उतार! काकडी, डाळींब व फुलांना बाजारात वाढती मागणी

Pune Crime: “वंशाला दिवा हवा” म्हणत गर्भपातास भाग पाडले; हुंड्यासाठी 25 लाख, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
3

Pune Crime: “वंशाला दिवा हवा” म्हणत गर्भपातास भाग पाडले; हुंड्यासाठी 25 लाख, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

Latur News: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई; पुण्यातील खून प्रकरणातील 5 आरोपींना लातुरात अटकेत
4

Latur News: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई; पुण्यातील खून प्रकरणातील 5 आरोपींना लातुरात अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.