
Ajit Pawar powerful in Pune district nagar parishad and nagar panchayat election result 2025
पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा विजय मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण 17 महत्त्वाच्या नगरपरिषद आणि नगरपालिका 9 जागांवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि गुलालाची उधळण करत राष्ट्रवादीने विजय साजरा केला आहे. सर्वत्र जल्लोषपूर्ण वातावरण असून अजित पवारांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अगदी एका वाक्यामध्ये आपली प्रतिक्रिया दिली. “जिल्हा कोणाच्या मागे आहे बघा” अशी एका वाक्यात अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे देखील वाचा : निवडणुकीमध्ये पैशांची गारपीट…! तेच मशीन सेटिंग अन् तोच आकडा; संजय राऊतांचा चढला पारा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री देखील आहेत. महायुतीच्या पहिल्या टप्प्यातील सत्तेवेळी पुण्यातील पालकमंत्री पदावरुन अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये सुरस दिसून आली होती. यानंतर आता झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीमधून अजित पवारांनी पुण्यामध्ये आपली ताकद दाखवून दिली. पुण्यातील शहरी आणि ग्रामीण भागामध्ये देखील अजित पवारांना मोठे समर्थन असून मतदार देखील त्यांच्याच पाठीशी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बारामती, इंदापूर आणि लोणावळा यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून येणे ही अजित पवारांसाठी मोठा विजय मानला जात आहे.
हे देखील वाचा : चिपळूण भाजप उमेदवाराच्या विजयाची सर्वत्र चर्चा; केवळ एका मताने मारली बाजी
पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदा
1 लोणावळा – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
2 तळेगाव – बहुमत राष्ट्रवादीचा मात्र नगराध्यक्ष भाजपचा
3 दौंड- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
4 चाकण – शिवसेना शिंदे गट
5 शिरूर- बहुमत भाजपचा आणि नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
6 इंदापूर- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
7 सासवड – भाजप
8 जेजुरी – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
9 भोर – बहुमत भाजपला मात्र नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
10आळंदी – भाजप
11 जुन्नर – शिवसेना शिंदे
12 राजगुरुनगर – शिवसेना शिंदे गट
13 बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
14 फुरसुंगी- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
पुणे जिल्ह्यातील नगर पंचायत
1 वडगाव मावळ – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
2 मंचर – शिवसेना शिंदे
3 माळेगाव – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट