Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका, ब्लॅकबॉक्स मधील संभाषण…; काँग्रेसचा सवाल

धावपट्टीच्या अगदी शेजारी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातावरुन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सवाल उपस्थित केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 06, 2026 | 01:51 PM
अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका, ब्लॅकबॉक्स मधील संभाषण...; काँग्रेसचा सवाल

अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका, ब्लॅकबॉक्स मधील संभाषण...; काँग्रेसचा सवाल

Follow Us
Follow Us:
  • अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका
  • संशय बळावत चालला आहे
  • हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रीया
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी अपघात झाला आहे. मुंबहून बारामतीला जाताना लॅंडिगवेळी हा अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी बारामतीमध्ये येत होते. मात्र धावपट्टीच्या अगदी शेजारी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातावरुन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सवाल उपस्थित केला आहे.

 

अजित पवार विमान अपघातावर संशय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अजित पवार यांचे शेवटचे संभाषण व्हायरल झाले आहे पण ब्लॅकबॉक्स मधील संभाषण अद्याप जाहीर झालेले नाही व चौकशीही होत नाही, हा विलंब अनाकलनीय आहे, त्यामुळे संशय बळावत चालला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली नाही. शपथविधीला जेवढी घाई केली तेवढी अपघाताच्या चौकशीसाठी करण्यात आली नाही.

अजित पवार यांच्यासारख्या शिस्तप्रिय लोकनेत्याच्या बाबतीत असा अपघात व्हावा हे पटत नाही. जोपर्यंत या अपघाताचा कार्यकारणभाव स्पष्ट होत नाही तोपर्यंत असे प्रश्न उपस्थित होतच राहणार. या अपघाताने अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत आणि सरकार हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळत आहे त्यावर शंका आणखी वाढत आहेत. अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी फडणवीस यांनी एक पत्र तातडीने केंद्रीय मंत्र्याला पाठवले व त्याचे उत्तरही आले आणि तेथेच हे प्रकरण थांबल्याने पाणी कुठेतरी मुरतेय असे सपकाळ म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्याला पुर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. कोयता गँग, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया, आका, खोके आणि बिश्नोई गँग हे त्याचेच परिणाम आहेत. सरकारच अशा प्रवृत्तींना खतपाणी घालत आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

विमान धावपट्टीजवळ कोसळले

लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीजवळ कोसळले. यामुळे विमानातील इंधनामुळे तीन स्फोट झाले. विमानाला लागलेल्या आगीमध्ये सर्व प्रवासी आणि विमान जळून खाक झाले. या विमानाचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. दुसऱ्या दिवशी बारामतीतील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे सुद्धा वाचा : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट; खारगे समितीला आणखी आठवड्याची मुदतवाढ

Web Title: Harshvardhan sapkal has asked questions about ajit pawars plane crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
1

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
2

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Goa News  : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा
3

Goa News : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
4

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.