Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भविष्यवाणी इथेच शिकलात का दादा? अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका कथित भोंदू व्यक्तीसोबतच्या फोटोवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, नगरसेवक अमोल बालवडकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 21, 2026 | 12:18 PM
भविष्यवाणी इथेच शिकलात का दादा? अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

भविष्यवाणी इथेच शिकलात का दादा? अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

Follow Us
Follow Us:

पुणे : नाशिक पोलिसांनी बलात्कार प्रकरणात एका अशोक खरात उर्फ कॅप्टन याला अटक केली आहे. अशोक खरात हा लोकांचे भविष्य सांगत होता, त्याच्याकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी जात होते, अशी माहिती समोर आली आहे. खरातसोबतचे अनेक राजकीय नेत्यांचे फोटो व्हायरल झाल्यामुळे विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. अशातच आता मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका कथित भोंदू व्यक्तीसोबतच्या फोटोवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, नगरसेवक अमोल बालवडकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे. बोगस भविष्यवाणी इथेच शिकलात का दादा! अशी टीका बालवडकर यांनी चंद्रकांत पाटलांवर केली आहे.

 

अमोल बालवडकर यांनी सोशल मिडीयातून म्हटले की, उच्च तंत्र की उच्च तंत्र मंत्र! बोगस भविष्यवाणी इथेच शिकलात का दादा! आदरणीय नामदार चंद्रकांत दादा मला आशा आहे आपल्या साध्या भोळ्या स्वभावाचा संबधित नराधम खरात याने गैरफायदा घेतला नसेल! जरी घेतला असेल तरी सदरील व्यक्तीची आपण कोणत्याही दबावात न येता रीतसर तक्रार करावी. आपण कोल्हापूरचे असलात तरी पुणेकर विशेषतः कोथरुडकर आपल्या कायम सोबत आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापूरचा वारसा सांगत फुले-रानडे-आगरकर या थोर समाजसुधारकांच्या पुण्यात आपण आलात. संतांनी प्रबोधन केलेल्या या महापुरुषांच्या महाराष्ट्रात उच्चशिक्षणासारखी गंभीर जबाबदारी असणारे चंद्रकांत पाटील हे मंत्री या भोंदू बाबासमोर इतके लीनदीन होऊन का बसले असतील, सदरील नराधम हा जप करून कोणत्या प्रकारच्या मंत्राचा आपल्यावर प्रयोग करत आहे हा प्रश्न कोथरूडच्या अत्यंत सुसंस्कृत आणि सुशिक्षित मतदारांना पडला आहे. कदाचित या मंत्राच्या प्रभावामुळे आपण कोथरुड येथील नागरिकांच्या समस्या सोडवू शकले नाही.. खरातसारख्या नालायक माणसासमोर मान तुकवणारा माणूस कोथरूडचा प्रतिनिधी कसा असू शकतो, ही चिंता कोथरुडकरांना पोखरून काढते आहे. कुठले आकडे जुळवायला आणि कसले भविष्य जाणून घ्यायला आपले चंद्रकांत दादा भोंदु खरातच्या नादी लागले, याचा खुलासा मायबाप कोथरूडकर जनतेसमोर तुम्ही केला पाहिजे.

 

Web Title: Amol balwadkar has posted a photo of minister chandrakant patil with bhondubaba on facebook

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Amol Balwadkar
  • Ashok Kharat
  • chandrakant patil

संबंधित बातम्या

अमोल बालवडकरांचा भाजपच्या तिरंगा रॅलीला जोरदार विरोध;15-20 हजार गाड्यामुळे वाहतूक कोंडीची भीती
1

अमोल बालवडकरांचा भाजपच्या तिरंगा रॅलीला जोरदार विरोध;15-20 हजार गाड्यामुळे वाहतूक कोंडीची भीती

पुणे विद्यापीठातील प्राध्यापक पदासाठी एक कोटी रुपयांचा ‘रेट’ सुरू; आमदार रोहित पवारांचा दावा
2

पुणे विद्यापीठातील प्राध्यापक पदासाठी एक कोटी रुपयांचा ‘रेट’ सुरू; आमदार रोहित पवारांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.