Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News: ‘जनता कधीही माफ करणार नाही…’ गोकुळच्या सत्तासंघर्षावरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांना थेट इशारा

Satej Patil Slams Hasan Mushrif Chandrakant Patil over Gokul : गोकुळमधील चार अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीवरून सतेज पाटलांनी महायुतीवर लोकशाहीचा खून केल्याचा आरोप केला. मुश्रीफ आणि चंद्रकांतदादांना जनता माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 04, 2026 | 09:16 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून वाद
  • सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल
  • सत्तासंघर्षावर सतेज पाटलांचे प्रसिद्धीपत्रक
Satej Patil : महायुतीने सत्तेची दंडूकशाही वापरुन गोकुळवर मतदानाचा अधिकार असलेले चार अशासकीय सदस्य नेमण्याचा घेतलेला निर्णय हा लोकशाहीचा खून आहे. सत्तेच्या हव्यासापोटी सर्वसामान्य लोकांच्या भावना खुंटीला टांगून आपण किती टोकाचे निर्णय घेवू शकतो, याचा पुरावाच महायुती सरकारने दिला आहे. आज गोकुळमधील सत्तेबाबत जो निर्णय घेतला आहे तसाच निर्णय भविष्यकाळात गावागावातील ग्रामपंचायत, दुधसंस्था, विकास सेवा संस्था, पतसंस्था यांच्या बाबतही घेण्यास महायुती मागेपुढे पाहणार नाही,हा धोका लोकांनी ओळखावा.

Maharashtr Tourism: महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा; विभागाचा सह्याद्री फार्म्स अन् टाटा स्ट्राइव्हसोबत करार

गोकुळचे शिल्पकार आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या वारसाला अध्यक्ष पदापासून रोखण्याची खेळी जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा खेळली आहे. गोकुळबाबत असे अन्यायकारक निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांतदादा पाटील यांना कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता कधीही माफ करणार नाही, असे पत्रक आमदार सतेज पाटील यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, गोकुळच्या निवडणुकीत साडेपाच लाख दूध उत्पादकांनी आमच्या समविचारी आघाडीला बहुमत दिले. त्यामुळे नैसर्गिक न्यायाने आमच्या आघाडीचाच अध्यक्ष होणे क्रमप्राप्त होते. पण महायुतीने कुटील राजनिती वापरुन अध्यक्ष निवड सभेला संचालकांनी गैरहजर राहणे, सत्ता मिळविण्यासाठी नियमबाह्य पध्दतीने मतदानाचा अधिकार असणारे चार अशासकीय सदस्य नेमणे, असे निर्णय घेतले आहेत. याचा अर्थ महायुतीच्या नेत्यांना साडेपाच लाख दूध उत्पादकांनी दिलेला कौल मान्य नाही, लोकशाही मान्य नाही, असाच होतो.

काल महायुतीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांनी काढलेल्या पत्रकात अध्यक्ष निवड करण्यासाठी आम्ही कोणाचीही अडवणूक केलेली नाही, गणपूर्तीसाठी सभेला उपस्थित राहणे म्हणजे आमच्या मतदारांच्या विश्वासाशी प्रतारणा करण्यासारखे आहे, दूध उत्पादकांनी आमच्यावर सोपवलेली विरोधकांची भूमिका आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत आहोत, राजकीय मतभेद असताना लोकशाहीच्या चौकटीत चर्चा व्हावी, अशी भूमिका मांडली आहे.

ही भूमिका महायुतीच्या नेत्यांच्या प्रत्यक्ष कृतीशी पूर्णपणे विरोधाभास दाखविणारी

प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहिली तर सभेला गैरहजर राहून महायुतीने अडवणूकच केली आहे. सभेचा कोरम पूर्ण न करुन मतदारांच्या विश्वासाशी प्रतारणा केली आहे. बहुमत मिळाले असताना सुध्दा चेअरमन निवडीत खोडा घालून पळपूट्या विरोधकाची भूमिका महायुतीने पार पाडली आहे. निवडणूक झाल्यानंतर बेकायदेशीररित्या सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करुन लोकशाहीची चौकट मुळासकट उखडली आहे. आणि याचा जाब जनता महायुतीला विचारल्याशिवाय राहणार नाही.

मुंबई हायकोर्टच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सोमवार दि.२ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणी मध्ये निवडून आलेल्या २५ संचालकांमधूनच चेअरमन निवड व्हावी, असा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयाचा अवमान होईल असे कृत्य राज्य शासन करणार नाही, याची मला खात्री वाटते. पण असा प्रयत्न झाल्यास त्याला कायदेशीर विरोध निश्चितपणे केला जाईल. त्याचबरोबर भविष्यात जनतेमध्ये जाऊन या निर्णयाविरोधात सातत्याने आवाज उठविला जाईल.

Pune Water: पुणेकरांना Diwali 2026 चे मोठे गिफ्ट; पाणी कपातीबाबत महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोकुळमधील वादाचे मुख्य कारण काय आहे?

    Ans: गोकुळवर मतदानाचा अधिकार असलेले चार अशासकीय सदस्य नियुक्त करण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे.

  • Que: गोकुळच्या सत्तासंघर्षावरून सतेज पाटील यांनी कोणावर टीका केली?

    Ans: आमदार सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर टीका केली.

  • Que: सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर काय आरोप केला?

    Ans: महायुतीने सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीचा खून केल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे.

Web Title: Satej patil slams hasan mushrif chandrakant patil over kolhapur gokul power struggle pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 09:11 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • Gokul Milk
  • Hasan Mushrif
  • kolhapur
  • MLA Satej Patil

संबंधित बातम्या

Mahalaxmi Express: महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या, दोन महिलांचे दागिने लंपास
1

Mahalaxmi Express: महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या, दोन महिलांचे दागिने लंपास

Gokul Milk Union Election Twist: गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीवरून संघर्षाच्या टप्प्यात प्रशासकीय धक्का; मोसमी बर्डे-चौगुलेंची बदली
2

Gokul Milk Union Election Twist: गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीवरून संघर्षाच्या टप्प्यात प्रशासकीय धक्का; मोसमी बर्डे-चौगुलेंची बदली

Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड लांबणीवर; कोरमअभावी सभा तहकूब
3

Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड लांबणीवर; कोरमअभावी सभा तहकूब

Gokul Chairman Election: कोल्हापुरात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदावरून राजकीय नाट्य सतेज पाटील
4

Gokul Chairman Election: कोल्हापुरात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदावरून राजकीय नाट्य सतेज पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.