नवरात्रोत्सवानिमित्त आरोग्य धात्रींचा पुण्यात विशेष सन्मान; भाजप वैद्यकीय आघाडीचा अनोखा उपक्रम
पुणे : वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहून समाजस्वास्थ्य चांगले ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या महिला डाॅक्टरांचा म्हणजे आरोग्य धात्रींचा विशेष सन्मान भाजप वैद्यकीय आघाडीच्या वतीने शनिवार २७ सप्टेंबर रोजी करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित सेवा पंधरवडा अंतर्गत तसेच नवरात्रोत्सवातील सातव्या माळेला भाजपच्या डीपी रोडवरील मुख्यालयात या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार सोहळ्यासाठी भाजप वैद्यकीय आघाडीच्या पुणे शहर प्रभारी डाॅ. मनीषा बाबर-जाधव तसेच डाॅ. अंजली कोहकडे यांच्या पुढाकारातून आयोजित या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. नित्यानंद ठाकूर, भाजप महिला शहराध्यक्ष हर्षदा फरांदे आदी उपस्थित होते.
डाॅ. गणेश परदेशी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश एकीकडे जोरदार प्रगती करीत असताना समाजात वैद्यकीय क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करणाऱ्या महिला डाॅक्टरांचा नवरात्रोत्सवातील हा सन्मान अत्यंत विशेष असे कार्य आहे. यासाठी भाजप महिला आघाडीने जो पुढाकार घेतला तो नक्कीच प्रशंसेस पात्र आहे. डाॅ. मनीषा जाधव आणि त्यांच्या सहकारी भाजप पदाधिकारी नेहमीच अशा प्रकारचे प्रशंसनीय कार्य करीत असतात, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात डाॅ. मनीषा बाबर-जाधव यांनी सत्कारमूर्ती महिला धात्रींचा परिचय करून दिला. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रात वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या डॉ रूची ठाकूर, डॉ हेमलता जळगावकर, डॉ उज्ज्वला हाके, डॉ प्रेरणा बेरी कालेकर, डॉ अंजली टिळेकर, डॉ. रेखा गलांडे, डॉ. सीमा सातव, डॉ. विनिता देशमुख, डॉ. मानसी अंबीकर, डॉ. शिल्पा थोरात, डॉ. भाग्यश्री कदम, डॉ पौर्णिमा गौरी, डॉ. सुनिता उपलेंचवार, डॉ.रेणुका चिप्पा, डॉ. डॉ अस्मिता भोई यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा बाबर-जाधव आणि डॉ. अंजली कोहकडे यांनी केले. डॉ. शुभदा कामत, डॉ. धडफळे, डॉ. रश्मी कुलकर्णी यांच्यासह भाजप वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या सत्कार सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेतले.