Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘घार’ बनली Pune Airport ची डोकेदुखी; Indian Air Force कडून विशेष गस्त आणि तंत्रज्ञानाचा वापर

विमानतळ परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र असल्याने येथे ड्रोन उडविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करून कारवाई केली जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 07, 2026 | 08:56 PM
‘घार’ बनली Pune Airport ची डोकेदुखी; Indian Air Force कडून विशेष गस्त आणि तंत्रज्ञानाचा वापर
Follow Us
Follow Us:
  • घारींचा वाढता वावर विमान सुरक्षेसाठी धोक्याची घंटा
  • हवाई दलाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग
  • लोहगाव हवाईतळावरून दररोज सरासरी २४० नागरी विमानांची ये-जा
पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लोहगाव हवाईतळावरील नागरी तसेच लष्करी विमानांच्या सुरक्षित उड्डाणांसाठी ‘घार’ (ब्लॅक काइट) हा पक्षी सर्वात मोठा धोका ठरत असल्याचे भारतीय हवाई दलाच्या निरीक्षणातून समोर आले आहे. विमानतळ परिसरातील उघड्यावर पडणारा कचरा आणि अपुरी कचरा व्यवस्थापन व्यवस्था यामुळे घारी मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून, उड्डाण आणि अवतरणाच्या वेळी पक्षीधडकेचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हवाई दलाने धावपट्टी परिसरात आठ ‘बर्ड डिस्ट्रॅक्शन मॉड्यूल’, १६ ठिकाणी नियमित मानवी गस्त आणि अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

लोहगाव हवाईतळावरून दररोज सरासरी २४० नागरी विमानांची ये-जा होते, तर वर्षभरात सुमारे ७२ हजार उड्डाणे होतात. याच धावपट्टीवर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचाही नियमित सराव सुरू असतो. पुणे परिसरात सुमारे २०० पक्षीप्रजाती आढळतात. त्यापैकी सुमारे २० प्रजाती विमानांच्या उड्डाण क्षेत्रात नियमित दिसून येतात. मात्र, आकाराने मोठी आणि उंचावर घिरट्या घालणारी घार ही विमान सुरक्षेसाठी सर्वाधिक धोकादायक ठरत असल्याचे हवाई दलाने स्पष्ट केले.

Pune Airport News: पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला उशीर; प्रवासी ९ तास खोळंबले

भारतात २०२० ते जून २०२५ या कालावधीत पक्षीधडकेच्या ५ हजार ७४० घटना नोंदविण्यात आल्या आहेत. या घटनांमध्ये ८०४ विमानांचे नुकसान झाले असून, काही प्रकरणांत वैमानिकांनाही गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे पक्षीधडकेचा प्रश्न हा विमान सुरक्षेसमोरील गंभीर आव्हान बनला असल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हवाई दलाचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांनी सांगितले की, विमानतळ परिसरातील उघड्यावर टाकला जाणारा कचरा हा घारींसह इतर पक्ष्यांच्या वाढत्या वावरामागील प्रमुख कारण आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पुणे महापालिका, जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांसोबत सातत्याने पाठपुरावा सुरू असून, कचरा व्यवस्थापन सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अपेक्षित सुधारणा अद्याप झालेली नसल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रवाशांसाठी खुशखबर! Pune Airport वरून ‘या’ मार्गांवर सुरू होणार उड्डाणे

दरम्यान, विमानतळ परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र असल्याने येथे ड्रोन उडविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करून कारवाई केली जाते. तसेच परिसरात वाढलेल्या कचऱ्यामुळे भटके श्वान आणि त्यांच्या मागावर आलेला बिबट्या काही दिवसांपूर्वी विमानतळ परिसरात दाखल झाल्याची घटनाही घडली होती. त्यामुळे कचरा व्यवस्थापन हा विमान सुरक्षेसह वन्यजीवांच्या वावराच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे.

Web Title: Black kite danger to pune airport flights indian air force bird distraction module technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 08:56 PM

Topics:  

  • birds
  • Indian Air Force
  • Pune Airport

संबंधित बातम्या

Indian Air Force:भारतीय हवाई दलाची ताकद वाढली! HAL कडून नवीन तेजस आणि HTT-40 विमाने सुपूर्द
1

Indian Air Force:भारतीय हवाई दलाची ताकद वाढली! HAL कडून नवीन तेजस आणि HTT-40 विमाने सुपूर्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.