पुणे एअरपोर्टवर वाढणार उड्डाणे (फोटो- istockphoto)
पुणे विमानतळावरून अतिरिक्त १५ फ्लाइट स्लॉट्सची मंजुरी
एकूण स्लॉट्सची संख्या २२० वरून २३५ वर पोहोचली
विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणांच्या संख्येत वाढ होणार
पुणे: पुणे विमानतळावरून अतिरिक्त १५ फ्लाइट स्लॉट्सची मंजुरी मिळाल्याने एकूण स्लॉट्सची संख्या २२० वरून २३५ वर पोहोचली आहे.या वाढत्या स्लॉट्समुळे प्रवाशांची ये जा अधिक सुलभ होणार असून, विमानतळावरून होणाऱ्या (Flights) उड्डाणांच्या संख्येत वाढ होणार आहे.यामुळे प्रवाशांची सोय होणार असून,या नव्या स्लॉट्समध्ये पुण्याहून मंगळूर,सोलापूर आणि बागडोगरा या नव्या मार्गांवर उड्डाणे सुरू होणार आहेत.
पुणे विमानतळावरून ‘उडान’ योजनेअंतर्गत सध्या चार शहरांशी विमान सेवा जोडण्यात आले आहे.या मार्गांमुळे दुर्गम भागांपर्यंत हवाई सेवा पोहोचत असून,संतुलित प्रादेशिक विकासाला चालना मिळत आहे.विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १ मे २०२६ पासून या नव्या उड्डाणांचे वेळापत्रक लागू होणार आहे. वाढलेल्या स्लॉट्स आणि नव्या मार्गांमुळे पुणे विमानतळावरून प्रवाशांना अधिक सुविधा व पर्याय उपलब्ध होणार आहेत.
Pune Airport : लोहगाव विमानतळावरून लवकरच १५ नवीन मार्गांवर विमानसेवा : मुरलीधर मोहोळ
महत्त्वाचे मुद्दे :
-एकूण फ्लाइट स्लॉट्स : २३५ (पूर्वी २२०)
-नव्याने वाढ : १५ स्लॉट्स
-नवे मार्ग : मंगळूर, सोलापूर, बागडोगरा
-अंमलबजावणी : १ मे २०२६ पासून
– ‘उडान’ योजनेअंतर्गत जोडलेली शहरे : नांदेड, किशनगढ, सिंधुदुर्ग, जळगाव
Pune Airport: पक्ष्यांमुळे पुणे विमानतळावर अलर्ट; विमान सेवेला अडथळा
होणार फायदे
-प्रवाशांच्या प्रवासात सुलभता व वेळेची बचत
-पर्यटन आणि व्यापाराला चालना
-प्रादेशिक संपर्कात वाढ
-विमानतळाची कार्यक्षमता आणि क्षमता वृद्धिंगत
-स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ
फ्लाईट्सचे भाव कडाडले!
भारतीय विमान कंपनी अकासा एअरनेही विमान तिकिटांच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. अकासा एअरने सांगितले की ते सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर प्रवाशांकडून प्रति सीट १९९ ते १३०० रुपयांपर्यंत इंधन अधिभार आकारेल. एअरलाइनने सांगितले की १५ मार्च रोजी रात्री ००:०१ वाजेपासून बुक केलेल्या सर्व विमान तिकिटांवर हा इंधन अधिभार आकारला जाईल. मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावामुळे विमान टर्बाइन इंधनाच्या (एटीएफ) किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे विमान कंपनीने भाड्यात इंधन अधिभार जोडला आहे.सध्या इंधन किमती वाढू लागल्या आहेत. इराण – इस्त्रायल युद्धाचा जगभरावर परिणाम होतो आहे आणि याचा भारतावरही मोठा परिणाम झालाय. यामुळे आता अनेक विमान कंपन्यांनाही फटका बसतो आहे.






