Maharashtra Politics: "... तर महाराष्ट्र कर्नाटकविरुद्ध याचिका दाखल करेल"; फडणवीसांचा स्पष्ट इशारा
देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर
अलमट्टी धरण विषयावर केले भाष्य
सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी
Fadnavis On Pune News: आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुंबईत स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर कोणीतरी लाल रंग फेकल्याची घटना घडली आहे. या प्रकरणावर देखील भाष्य केले आहे. दरम्यान पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते जाणून घेऊयात. तसेच फडणवीस यांनी अलमट्टी धरणावर देखील भाष्य केले आहे.
🕖 6.48pm | 17-9-2025📍Pune.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Pune https://t.co/8QxntQbUBQ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 17, 2025
मुंबईत स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आला आहे. त्यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसैनिकांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अशा प्रकारची घटना निषेधार्हच आहे. ज्या कोणत्या समाजकंटकाने ही घटना केली असेल त्याला पोलिस शोधून काढतील. त्याच्यावर कारवाई करतील. यापेक्षा त्याला राजकीय रंग देणे हे मला योग्य वाटत नाही.”
“महाराष्ट्राचा अलमट्टी धरणाची ऊंची वाढवायला विरोध आहे. या संदर्भात आवश्यकता पडली तर महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात जाईल आणि त्या ठिकाणी कर्नाटकविरुद्ध याचिका दाखल करेल, ” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी ‘त्या’ लोकांना सुनावलं
आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. यानिमित कार्यक्रमाला आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र त्यांचे भाषण सुरू असताना काही लोकांनी तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या लोकांना चांगलेच सुनावले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू होते. तेव्हा काही लोकांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. घोषणाबाजी सुरू ककेली. आरक्षणाच्या विषयावरून ही घोषणाबाजी केली जात होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणात घोषणाबाजी करणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. हैदराबाद गॅझेट रद्द करावे अशी घोषणा बाजी करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. आजच्या या महत्वाच्या दिवशी कार्यक्रम सुरू असताना काही लोक या ठिकाणी येऊन घोषणाबाजी करतात. यापेक्षा मोठा स्वातंत्र्यसेनानींचा अपमान असू शकत नाही. परमेश्वर त्यांना सुबुद्धी देवो. चार लोक येतात, घोषणाबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, हे योग्य नाही. मी त्याबद्दल काही बोलणार नाही.