नागरिकांना आता अॅपद्वारे नोंदवता येणार खड्ड्यांची तक्रार
Pune-Solapur highway: कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेला पुणे-सोलापूर महामार्ग उखडला गेला आहे. त्यामुळे प्रवाशांकडून रोष व्यक्त केला जात आहे.अवघ्या आठ महिन्यातच रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून संपूर्ण महामार्गावर खडी पसरली आहे. रस्त्यावर पसरलेल्या या खडीमुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे करोडो रुपये आज पाण्यात वाहून जात असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हडपसर रवी दर्शन सोसायटी ते मांजरी फार्म पुढे फुरसुंगी फाटा दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावर डांबरीकरण करण्यात आले. पूर्वीचा रस्ता अतिशय सुस्थितीत असतानाही त्यावर दुरुस्तीचे (नूतनीकरण) काम करण्यात आले होते. यासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.मात्र ,अवघ्या आठ महिन्यातच झालेल्या इतक्या कमी पावसात देखील हा रस्ता पुरता उखडला गेलाय. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने खर्च केलेले करोडो रुपये पावसाच्या पाण्यात वाहून गेले असेच म्हणावे लागेल. पुणे-सोलापूर महामार्ग महत्वाचा रस्ता आहे. तरी देखील या रस्त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत असताना देखील या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून केलेले डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, अशी कबुली तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधिमंडळात दिली होती. विधिमंडळ अधिवेशनात आमदार भीमराव तापकीर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण यांनी ही माहिती दिली होती. काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावर वाहतूक वर्दळ असल्याने काही ठिकाणी खडी निघून गेल्याचे निदर्शनास आले होते. या ठिकाणचा रस्ता संबंधित कंत्राटदाराकडून पूर्ववत करण्यात आला आहे. असेही त्यावेळी सांगण्यात आले होते. आज प्रत्यक्षात मात्र, हलक्याच पावसात कामाचा दर्जा उघडा पडला आहे.
आठ -नऊ महिन्यापूर्वी रवीदर्शन ते मांजरी फार्म दरम्यान आवश्यकता नसतानाही राष्ट्रीय महामार्गाकडून करोडो रुपये खर्च करून या रस्त्याचे काम सुरू होते. ठेकेदाराकडून काम अतिशय निकृष्ट पद्धतीने होत होते यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी श्रुती नाईक यांना प्रत्यक्ष भेटून कामाच्या दर्जाबाबत पत्रही दिले होते व कामाची पाहणी करून ठेकेदाराला काम चांगले करण्यात सांगण्याबाबतही सांगितले होते. मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.त्याचा परिणाम आज झालेल्या परिस्थितीतून दिसून येत आहे. केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जनतेचे करोडो रुपये पाण्यात वाहून जात आहेत.- राहुल शेवाळे, सरचिटणीस, भारतीय जनता पक्ष, पुणे जिल्हा.
शेअर बाजारात पुन्हा घसरण, सेन्सेक्स ८१५०० च्या खाली तर निफ्टी ९७ अंकांनी घसरला
पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून राहत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या काही व्यवसायिकांनी पावसाळी लाईनमध्ये राडारोडा टाकून बुजवल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी खडी उघडी पडली आहे .संबंधित ठेकेदाराला नोटीस पाठवण्यात आली, असून खराब झालेल्या ठिकाणी रस्त्याचे काम तात्काळ करण्यात येईल.- अतुल सुर्वे शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे