Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime: पुण्यात सायबर चोरट्यांकडून दोन महिलांची मोठी फसवणूक; तब्बल ४६ लाखांना घातला गंडा

महिलेला संपर्क साधत मुंबई विमानतळावरुन कुरिअरव्दारे एक पाकिट पाठविले आहे. या पाकिटावर तुमचे नाव आहे. त्यात दोन पारपत्र, लॅपटॉप, अमली पदार्थ सापडले असून, पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची बतावणी चोरट्यांनी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 27, 2024 | 07:15 PM
Cyber Crime: पुण्यात सायबर चोरट्यांकडून दोन महिलांची मोठी फसवणूक; तब्बल ४६ लाखांना घातला गंडा

Cyber Crime: पुण्यात सायबर चोरट्यांकडून दोन महिलांची मोठी फसवणूक; तब्बल ४६ लाखांना घातला गंडा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: पुणे शहरात  गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. हीट अँड रन, कोयता गॅंग, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान पुणे पोलीस गुन्हे रोखण्यासाठी कठोर पावले उचलत आहेत. कडक कारवाई देखील करत आहेत. मात्र अशा गुन्ह्यासोबतच आता सायबर क्राईमचे गुन्हे देखील वाढताना दिसत आहेत. पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. सायबर चोरट्यांकडून सातत्याने फसवणूकीचे सत्र सुरू असून, दोन महिलांची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात पद्मावती भागातील ३६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदारांना शेअर बाजारात गुंतवणूकीचे आमिष दाखविले. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल,असे सांगितले. चांगला परतावा मिळेल या आमिषाने महिलेने चोरट्यांनी सांगितल्यानुसार वेळोवेळी २६ लाख २५ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा मिळाला, असे भासविले. महिलेने परताव्याबाबत विचारण केली. तेव्हा चोरट्यांनी मोबाईल बंद केले. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.

पार्सल पकडल्याची भिती दाखवून २० लाखांना गंडा

विमाननगरमधील महिलेची सायबर चोरट्यांनी पोलीस कारवाईची भीती दाखवून २० लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोदंवला आहे. तक्रारदार महिलेला संपर्क साधत मुंबई विमानतळावरुन दक्षिण कोरियात कुरिअरव्दारे एक पाकिट पाठविले आहे. या पाकिटावर तुमचे नाव आहे. त्यात दोन पारपत्र, लॅपटॉप, अमली पदार्थ सापडले असून, याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. कारवाईची भीती दाखवून चोरट्यांनी महिलेला तातडीने बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने शहानिशा न करता चोरट्यांच्या खात्यात २० लाख रुपये जमा केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तपास करत आहेत.

हेही वाचा: घरी बसून पैसे कमावणे महिलेला पडलं महागात; 31 लाखांचा घातला ऑनलाईन गंडा

क्रेडीड कार्डच्या बहाण्याने सव्वा लाखांची फसवणूक

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिटकार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाकडून १ लाख ३१ हजार रूपये ऑनलाईन उकळले. याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कोथरूड येथील हॅप्पी कॉलनीत राहणाऱ्या ७९ वर्षीय ज्येष्ठाने अलंकार पोलिसांत तक्रार दिली आहे.

ऑनलाइन पैसे कमावणे पडले महागात

बाईलवर घरी बसून ऑनलॉईन पैसे कमवा, या आशयाचा व्हिडिओ पाहणे उच्चशिक्षित शिक्षिकेला महागात पडले. या व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित शिक्षिकेला तब्बल 31 लाख 15 हजार 220 रुपयांचा ऑनलाईन चुना लागल्याने, परीसरात खळबळ उडाली आहे. ही घटना गुरूवारी (दि. 24) उघडीस आली. पीडित शिक्षिकेने याची तक्रार बल्लारपूर पोलिस स्टेशन येथे दाखल केलेली आहे.

Web Title: Cyber fraud with two womens for 46 lakhs rupees in sahkarnagar pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2024 | 07:14 PM

Topics:  

  • cyber crime
  • Pune

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.