हिंजवडीतील आयटी कंपनीकडून ४०० उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक (File Photo : Fraud)
बल्लारपूर : मोबाईलवर घरी बसून ऑनलॉईन पैसे कमवा, या आशयाचा व्हिडिओ पाहणे उच्चशिक्षित शिक्षिकेला महागात पडले. या व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित शिक्षिकेला तब्बल 31 लाख 15 हजार 220 रुपयांचा ऑनलाईन चुना लागल्याने, परीसरात खळबळ उडाली आहे. ही घटना गुरूवारी (दि. 24) उघडीस आली. पीडित शिक्षिकेने याची तक्रार बल्लारपूर पोलिस स्टेशन येथे दाखल केलेली आहे.
संबंधित महिला उच्च शिक्षित असून, त्यांनी 21 मे ते 20 ऑगस्ट दरम्यान फेसबुकचा वापर करीत असताना, त्यांना घरी बसल्या पैसे कमवा असा व्हिडीओ दिसून आला. त्यावेळी तिने सदर व्हिडिओ पाहून व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे टेलीग्रॉम चॅनल फालो केले. त्यात तिला फॅशन संबंधित कपडे, ज्वेलरी आणि इतर सामान यांचे व्हिडिओ बघून स्क्रीनशॉट पाठविणे याबदल्यात प्रत्येकी स्क्रीन शॉट 50 रूपये प्रमाणे टॉस्क देण्यात आले.
त्यानंतर फिर्यादीने एकूण 12 टॉस्क पूर्ण केले. त्याचे काही पैसे फिर्यादीत देऊन तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर 13 टॉस्क पेड टास्क असल्याचे सांगून तिला 12 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर लगातार तिला तुमचे अकाऊंटला होल्ड लागले आहे. अनफ्रिज करण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यानंतर तिने पाठविलेली रक्कम जास्त असल्याचे सांगुन तिला सायबर पोलिस ठाणे तसेच इन्कम टॅक्सची धमकी देवुन तिची फसवणुक करून वारंवार तिच्याकडुन पैसे घेवुन 27 लाख 60 हजार 980 रुपयांची आर्थिक फसवणुक केली.