Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

कंपनी मालकाचा डीपी वापरून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवत मोठ्या रकमेची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश पुणे सायबर पोलिसांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 22, 2026 | 09:05 PM
कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Follow Us
Close
Follow Us:
  • कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक
  • पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
  • दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नागरिकांच्या लाखो रुपयांवर दररोज चोरटे डल्ला मारत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. कंपनी मालकाचा डीपी वापरून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवत मोठ्या रकमेची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश पुणे सायबर पोलिसांनी केला आहे. तब्बल १ कोटी ९५ लाख रुपये इतकी आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

अजय रामविलास यादव (वय २२) व सलमान गौस मोहियुद्दीन अजनाल (वय ३२, रा. कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे तसेच पोलिस निरीक्षक संगीतादेवी काटे, उपनिरीक्षक सुशील डमरे, पोलिस अंमलदार संदीप कणसे, प्रविणसिंग राजपूत, राजूदास चव्हाण, अमर बनसोडे, शीतल डांगरे व अनिकेत भिंगारे यांच्या पथकाने केली आहे.

कंपनी मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅप डीपीला ठेवून त्याद्वारे कंपनीतील ग्राहकांना थेट मेसेज पाठवून या ग्राहकांकडून १ कोटी ९५ लाख रुपये उकळल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला व फसवणुकीसाठी वापरण्यात आलेली बँक खाती कर्नाटकातील बेळगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले. नंतर सायबर पोलिस पथकाने सापळा रचून अजय यादव व सलमान अजनाल या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ३ मोबाईल, बँकेचे पासबुक व डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहे. आरोपींकडून आणखी काही आर्थिक फसवणूक प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा : घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या; बारामती तालुका पोलिसांची कारवाई

खातरजमा केल्याशिवाय कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करू नये

नागरिकांनी व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल किंवा कॉलद्वारे येणाऱ्या पेमेंट संदर्भातील संदेशांची खातरजमा केल्याशिवाय कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करू नये, तसेच संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Pune police have arrested two thieves who were involved in fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • cyber crime

संबंधित बातम्या

Crime News: लिव्ह-इन अन् शेवटी विश्वासघात! लग्नाचे आमिष दाखवत तीन वर्षे संबंध, वारंवार केलेत अत्याचार
1

Crime News: लिव्ह-इन अन् शेवटी विश्वासघात! लग्नाचे आमिष दाखवत तीन वर्षे संबंध, वारंवार केलेत अत्याचार

बारामती एमआयडीसी परिसरात चोरीच्या घटना; अल्पवयीन मुलांसह भंगार व्यावसायिक अटकेत
2

बारामती एमआयडीसी परिसरात चोरीच्या घटना; अल्पवयीन मुलांसह भंगार व्यावसायिक अटकेत

Ulhasnagar Crime : नकली पिस्तूल आणि खोटा सीबीआय बॅच;  नोकरीच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारा भामटा जेरबंद
3

Ulhasnagar Crime : नकली पिस्तूल आणि खोटा सीबीआय बॅच; नोकरीच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारा भामटा जेरबंद

“बाबा मला वाचवा”, मृत्यूच्या काही तास आधी केला वडिलांना फोन पण… बिहारमध्ये हुंड्याच्या आगीत जळून निघाली विवाहित महिला
4

“बाबा मला वाचवा”, मृत्यूच्या काही तास आधी केला वडिलांना फोन पण… बिहारमध्ये हुंड्याच्या आगीत जळून निघाली विवाहित महिला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.