Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dagdusheth Halwai Ganapati : नववर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी : दगडूशेठ’ गणपती मंदिरात भाविकांची पहाटेपासून अलोट गर्दी

आज वर्षातील पहिली अंगारकी चर्तुथी आहे. यानिमित्ताने पुणेकरांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली असून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 06, 2026 | 05:42 PM
Dagdusheth Halwai Ganpati on Angarki Chaturthi Devotees rush and flower decoration Pune News

Dagdusheth Halwai Ganpati on Angarki Chaturthi Devotees rush and flower decoration Pune News

Follow Us
Close
Follow Us:
  • अंगारकी चतुर्थीला गणपती मंदिरामध्ये मोठी गर्दी
  • दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी तुफान गर्दी
  • दगडूशेठ बाप्पाला विविध रंगेबेरंगी फुलांची आकर्षक आरास
Dagdusheth Halwai Ganapati : पुणे : नवीन वर्षाला सुरुवात झाली असून आज (दि.06 जानेवारी) नवीन वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी आहे. यानिमित्ताने भाविकांनी गणेश मंदिरामध्ये मोठी गर्दी केली. अनेक गणेश भक्तांनी शहरातील विविध गणपती मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली आहे. पहिल्या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने पुणेकरांनी (Pune News) त्यांचा लाडका बाप्पा दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला मोठी गर्दी केली आहे. अगदी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी देखील भक्तांनी दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला गर्दी केली होती.

ओम् गं गणपतये नम :…गणपती बाप्पा मोरया… जय गणेश… मंगलमूर्ती मोरया… अशा गणेश नामाच्या जयघोषाने ‘दगडूशेठ’ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. नववर्षातील पहिला अंगारकी संकष्टी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली पारंपरिक आकर्षक पुष्पसजावट आणि विद्युतरोषणाने संपूर्ण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उजळून निघाले होते.

हे देखील वाचा : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक, श्री गणेशयाग देखील मंदिरात पार पडला. याशिवाय श्रीं च्या मंगलआरती भाविकांनी मोठया संख्येने गर्दी केली.

हे देखील वाचा : राज साहेबांची हिरवं रक्त असलेल्या लोकांशी युती…! कमळ हाती घेताच संतोष धुरींनी केली आगपाखड

अंगारकी चतुर्थी अशा महत्त्वाच्या दिवशी मंदिराला आकर्षक सजावट नेहमीच केली जाते. विविध रंगीबेरंगी फुलांती आरास पाहण्यासाठी पुणेकर मोठ्या उत्साहाने येत असतात. यावेळी देखील मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिरावर केलेल्या पुष्पसजावटीकरिता झेंडू, गुलाब, शेवंती आदी फुले वापरुन पारंपरिक सजावट करण्यात आली होती. तर, सभामंडपात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली. मंगळवारी पहाटेपासून भाविकांकरीता दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी पहाटेपासूनच मोठया संख्येने गर्दी केली. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता, अप्पा बळवंत चौकाच्या पुढे पर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिरावर आकर्षक तोरण आणि रांगोळ्यांची सजावट देखील करण्यात आली होती.

नवीन वर्षाच्या स्वागताला देखील पुणेकरांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये मोठी गर्दी केली होती. वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. यामुळे दर्शनची रांग अगदी बाहेर आप्पा बळवंत चौकापर्यंत गेली होती. आता पुन्हा एकदा दर्शनाची रांग लांबपर्यंत गेली असून अनेकांनी श्रद्धा आणि भक्तीने बाप्पाची आराधना केली आहे.

Web Title: Dagdusheth halwai ganpati on angarki chaturthi devotees rush and flower decoration pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • dagadu sheth halwai temple
  • pune news
  • Sankashti Chaturthi

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?
1

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?

लहू बालवडकरांच्या वाढदिवशी ‘विकासाचा धमाका’; महसूल मंत्री बावनकुळेंकडून प्रभाग ०९ साठी भव्य विकास आराखड्याची घोषणा
2

लहू बालवडकरांच्या वाढदिवशी ‘विकासाचा धमाका’; महसूल मंत्री बावनकुळेंकडून प्रभाग ०९ साठी भव्य विकास आराखड्याची घोषणा

Pune News: म्हाळुंगे येथे राष्ट्रवादीला उस्फूर्त प्रतिसाद; पदयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग
3

Pune News: म्हाळुंगे येथे राष्ट्रवादीला उस्फूर्त प्रतिसाद; पदयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग

महिलांसाठी देशातील सुरक्षित शहर कोणते? ‘या’ शहराने पटकावला 1 ला नंबर; मुंबई, पुण्याचे स्थान काय?
4

महिलांसाठी देशातील सुरक्षित शहर कोणते? ‘या’ शहराने पटकावला 1 ला नंबर; मुंबई, पुण्याचे स्थान काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.