Pune News : “ ता उम्र राहुल जी आप यह गलती कर बैठे, धूल चेहरे पर थी और आईना पोछते रहे !” अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी जोरदार टीका केली. महाराष्ट्राच्या निवडणुकीत २०२४ मध्ये लोकशाहीला हानी पोहचविण्याची एक सुनियोजित योजना असल्याच्या गांधी यांच्या आरोपावर त्यांनी हे उत्तर दिले आहे.
औंध येथील महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनानंतर महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील निवडणुकीबाबत फॅट्स आणि फिगर दिले गेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचे बोलणं सोडतील.
BJP-Congress Politics: हिंमत असेल तर…; राहुल गांधींसाठी वडेट्टीवार मैदानात, बावनकुळेंना खुले आव्हान
लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी कल्याण विभागाचे ३३५ कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वळवल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला आहे. यावर बोलताना त्यांनी, आपल्या अर्थसंकल्पाच्या नियमांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या हेडखालीच दाखवाव्या लागतात. त्याची तरतूद ही त्या हेड खालीच करावी लागते. म्हणूनच अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना त्या हेड खाली ती तरतूद केली आणि भाषणात सांगितले की, आम्ही रेग्युलर तरतुदी पेक्षा किती जास्तीची तरतूद केलेली आहे आणि ती कशाकरता वापरणार आहोत.
जेव्हा दुसऱ्या कामाकरता एखादा निधी ठेवला असेल आणि तो तिसऱ्या कामावर खर्च केला जातो, तेव्हा आपण निधी वळवला असं म्हणतो. अर्थसंकल्पामध्ये जर कायद्यानेच तुम्हाला त्या विभागाकरता किंवा त्या घटकाकरता जो पैसा खर्च होतो तो त्या घटकाच्या मंत्रालयात दाखवावा लागत असेल तर ते दाखवणे चूक नाही. पैसा कुठेही वळवलेला नाही. त्या विभागातच तो पैसा दाखवणे हा अर्थसंकल्पाचा नियम आहे. त्याचप्रमाणे ते अर्थसंकल्पामध्ये दाखवलेले आहे आणि त्यातून तो खर्च केलेला आहे,” असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Slum Rehabilitation Act: SRA सारख्या योजनांचा पुनर्विचार व्हावा; असीम सरोदेंना नेमक म्हणायचंय काय?
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकार्यांवर आरोप होत आहेत, त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ज्या आरोपांमध्ये तथ्य असेल. तसेच पुरावे असतील तिथं योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. सामनामधील लेखाबाबत बोलताना त्यांनी सामना काय आहे, ती कोणती सर्टिफिकेट देणारी संस्था आहे का असा प्रतिप्रश्न करून, हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असतानाच सामना होता आता काय आहे असा टोला लगावला.
सौर ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राने विशेषत कृषी पंपासंदर्भात भरीव काम केले आहे. संपूर्ण देशात ४ लाख कृषीपंप लावले गेले आहेत, पण एकट्या महाराष्ट्रात तब्बल ५ लाख कृषीपंप लागले आहेत. आता सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत १६ हजार मेगावॅटचे फिडर हे सौरऊर्जेवर नेण्यात येत आहे, आशिया खंडातील हा सर्वात मोठा प्रकल्प असून, येत्या २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.