Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Water News: समाविष्ट गावांना शुध्द पाणीपुरवठ्यासाठी ५०० कोटी; उशिरा का होईना शासनाला जाग

महापालिकेने १२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी केलेल्या प्रकल्प आराखड्यानुसार खडकवासला धरणाच्या पायथ्याशी १०० एमएलडीचे प्रत्येकी दोन जलशुद्धीकरण केंद्र, पंपहाऊस व जॅकवेल बांधण्यात येणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 21, 2025 | 09:27 PM
Pune Water News: समाविष्ट गावांना शुध्द पाणीपुरवठ्यासाठी ५०० कोटी; उशिरा का होईना शासनाला जाग
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  सिंहगड रस्ता परिसरात आतापर्यंत ५ जणांचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. उशिरा का होईना शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी शासनाने पावले उचलल्याने जीव गेल्यावर सरकार हलल्याची प्रचिती येत आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील पाच ते सहा गावांमध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराची साथ पसरली.

त्यामुळे या गावांना होणार्‍या अशुध्द पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांनी सिंहगड रस्ता परिसरातील समाविष्ट गावांना शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी ५०० कोटी रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिल्याचे जाहीर केले आहे. या योजनेनुसार राज्य शासन व महापालिका प्रत्येकी ५० टक्के खर्च करणार आहे.

दरम्यान, पालकमंत्री पवार यांच्या घोषनेनंतर महापालिकेने तत्काळ समाविष्ट १२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. त्यानुसार संबंधित १२ गावांची  लोकसंख्या आणि पाण्याची मागणी यानुसार ८९० कोटींचा योजना आराखडा तयार केला आहे.

महापालिकेने १२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी केलेल्या प्रकल्प आराखड्यानुसार खडकवासला धरणाच्या पायथ्याशी १०० एमएलडीचे प्रत्येकी दोन जलशुद्धीकरण केंद्र, पंपहाऊस व जॅकवेल बांधण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शुद्ध व अशुद्ध पंपिंग मशिन तसेच मुख्य जलवाहिन्या व वितरण वाहिन्या टाकण्यात येणार आहेत.

जलशुद्धीकरण केंद्रासह जॅकवेल, पंपहाऊससाठी ११ एकर जागेची आवश्यकता लागणार आहे. या भागात पाटबंधारे विभागाची जागा असून, महापालिकेने त्या जागेची मागणी केली आहे. तसेच ५ पंप हाऊस व ४२ टाक्यांच्या जागांपैकी टप्पा १ मध्ये ५ पंपहाऊस व ३३ टाक्यांचा समावेश आहे. उर्वरित ९ टाक्या टप्पा २ मध्ये आहेत. त्यासाठी महापालिकेकडे २० जागा उपलब्ध असून, १८ जागांसाठी टप्पा १ मध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. दरम्यान, टप्पा एक मध्ये भूसंपादन व देखभाल दुरुस्तीची कामे वगळून उर्वरित आवश्यक कामांसाठी ६०६ कोटी लागणार आहेत, तर टप्पा दोनमध्ये २८४ कोटींची आवश्यकता लागणार आहे.

योजनेतील  १२ गावांची २०२४ पर्यंतची अंदाजित लोकसंख्या ३ लाख ४८ हजार ५५८ इतकी आहे. त्यासाठी ६६.१० एमएलडी इतकी पाण्याची मागणी आहे. या गावांची २०२५ पर्यंतची अंदाजित लोकसंख्या ७ लाख ६० हजार ६६३ इतकी असेल, त्यासाठी १५१.७ एमएलडी इतकी पाण्याची आवश्यकता असेल.

महापालिकेत समाविष्ट १२ गावांना शुद्ध पाणीपुरवठ्याची योजना राबविण्यासाठी ६०६ कोटींच्या योजनेचा प्रस्ताव नुकताच राज्य शासनाला पाठविला आहे. राज्य शासन व महापालिका प्रत्येकी ५० टक्के याप्रमाणे खर्चाचा प्रस्ताव आहे. शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर प्रत्यक्ष योजनेच्या कामाला सुरुवात होईल.

– नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा, विभागप्रमुख, पुणे मनपा

‘या’ गावांना मिळणार शुद्ध पाणी

धायरी, नांदोशी, किरकटवाडी, खडकवासला, सणसनगर, नांदेड, नर्‍हे, कोळेवाडी, जांभूळवाडी, भिलारवाडी, मांगडेवाडी

Web Title: District planning committee approves rs 500 crore for providing clean water to villages in sinhagad area after gbs virus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 09:27 PM

Topics:  

  • GBS virus
  • Pune
  • Water supply

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.