Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात …”; ‘स्किल डेव्हलपमेंट अँड टीव्हीईटी’ आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ.निलम गोर्‍हेंचे वक्तव्य

युवकांच्या या देशात त्यांच्या कौशल्य गुणांना वाव देऊन त्या पद्धतीचे रोजगार उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे येथे युवकांना रोजगार शोधण्याची गरज पडणार नाही तर रोजगार त्यांच्याकडे येईल, असे डॉ.शां.ब. मुजुमदार म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 26, 2025 | 08:57 PM
"महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात ..."; 'स्किल डेव्हलपमेंट अँड टीव्हीईटी' आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ.निलम गोर्‍हेंचे वक्तव्य

"महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात ..."; 'स्किल डेव्हलपमेंट अँड टीव्हीईटी' आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ.निलम गोर्‍हेंचे वक्तव्य

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: “शासनाच्या माध्यमातून कौशल्य विकासासाठी राबविल्या जाणार्‍या योजनेतून समाजाला चांगले फलित मिळतात. त्यामुळे मंत्र्यांनी समोर येऊन सर्वांच्या प्रगतीसाठी नव्या गोष्टी मांडाव्यात.” असे विचार महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त
केले.

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, युनेस्को आणि एनएसडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने स्किल डेव्हलमेंट अँड टीव्हीईटी (तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण) या विषयावर आयोजित एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.

यावेळी अध्यक्षस्थानी सिम्बायोसिसचे अध्यक्ष डॉ. शां.ब. मुजुमदार हे होते. तसेच युनेस्को युनिवोकचे फेडरिक युब्लर, लडाख येथील एचआयएचे संस्थापक संचालक सोनम वांगचुक, पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंग व सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एसएसपीयूच्या) प्र कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार हे उपस्थित होते.

जागतिक शिक्षणाचे आदान प्रदान करणे, नाविण्यपूर्ण शिक्षणाची पद्धती व क्षमता निर्माण करण्यासाठी एसएसपीयू आणि युनेस्को यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. तसेच पहलगाममधील दुखद घटनेबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली वाहिण्यात आली. डॉ.निलम गोर्‍हे म्हणाल्या,” महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यातील कौशल्या गुणांना अधिक वाव दयावा. त्यांच्या दिसण्यापेक्षा त्यांच्या गुणांना प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे. समाजात त्यांचे स्थान अधोरेखित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. तसेच शाश्वत विकासासाठी ग्रामिण क्षेत्रातील पर्यावरण, जल आणि आरोग्यासाठी कौशल्य अत्यंत महत्वाचे आहे.”

सोनम वांगचुक म्हणाले,” शिक्षण क्षेत्रातील एआय व इंटरनेट गोष्टीने संपूर्ण जग बदलल आहेे. जुन्या काळात शिकण्याची पद्धत ही सर्वोत्तम असल्याने बुद्धीमत्तला अधिक जोर दयावा लागत असे. जीवनात प्रात्यक्षित शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक शिक्षण महत्वाचे आहे. हे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जाते. इंडस्ट्रीमध्ये स्किल्ड मॅन पॉवरची गरज आहे. नवी शिक्षण पद्धती खूप चांगली असली तरी त्याचे प्रात्यक्षात उतरणे महत्वाचे आहे. विद्यापीठ हे केवळ माहितीचे स्त्रोत राहिले आहे. त्यामुळे भविष्यातील शिक्षण पद्धतीत बदल घडावे. अत्याधुनिक काळात शिक्षकांनी स्वतःची भूमिका बदलने गरजेचे आहे. भविष्यात ब्राइट हेड, स्किल हॅन्ड आणि हार्ट या तीन गोष्टी सर्वात महत्वाचे असतील. प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठ हे कौशल्यपूर्ण असावे.”

डॉ.शां.ब. मुजुमदार म्हणाले,” युवकांच्या या देशात त्यांच्या कौशल्य गुणांना वाव देऊन त्या पद्धतीचे रोजगार उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे येथे युवकांना रोजगार शोधण्याची गरज पडणार नाही तर रोजगार त्यांच्याकडे येईल. वर्तमानकाळात इंडस्ट्री आणि विद्यापीठामध्ये योग्य समन्वय साधून त्याचा उपयोग केला पाहिजे. देश प्रगतीसाठी महिला सशक्तीकरण सर्वात महत्वाचे आहे.”

डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या,” विकसित भारत बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्किल इंडिया व मेक इंन इंडियाच्या धर्तीवर विद्यापीठाने पाऊले उचलीत आहेत. विकसीत भारतासाठी या विद्यापीठाचे खूप मोठे योगदान आहे. सक्षम महिला सक्षम समाज यानुसार महिलांच्या विकासावर भर देण्याचा प्रयत्न करीत आहोत. गेल्या ५ वर्षात हजारो महिलांना भविष्यातील कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. आधुनिक काळात इंडस्ट्रीला आवश्यक कौशल्य कर्मचारी देण्यावर अधिक भर देऊन प्रशिक्षित करण्याचे कार्य केले जाते. राष्ट्र उभारणीसाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्या दिशेने त्यांच्यासाठी हे विद्यापीठ कार्य करीत आहे.”

युनेस्को नवी दिल्ली प्रादेशिक कार्यालय दक्षिण आशिया चे संचालक टिम कर्टिस यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देतांना सांगितले,” संपूर्ण जगात युवकांची संख्या अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगाराची समस्या उद्भवणार आहे. तसेच महिला सशक्तीकरणाबरोबरच त्यांच्या कौशल्य विकासावर अधिक भर दयावा. आधुनिक काळात एआय आणि शाश्वत विकासाची भूमिका महत्वाची असेल.”

Web Title: Dr neelam gorhe skill development and tvet international summit opening symbiosis pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 08:56 PM

Topics:  

  • dr. Neelam Gorhe
  • Pune
  • pune news
  • Uday Samant

संबंधित बातम्या

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
1

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन
2

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन

Atharva Sudame : रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! ‘त्या’ रिलवरुन PMPML ची थेट नोटीस
3

Atharva Sudame : रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! ‘त्या’ रिलवरुन PMPML ची थेट नोटीस

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान
4

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.