
Farmers News: ओतूर येथील जुन्नर तालुक्यात सध्या कांदा लागवडीचा हंगाम सुरू आहे, पण यावेळी शेती कामासाठी लागणाऱ्या मजुरीच्या दरात मोठी वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. मजुरीचे दर तब्बल ७०० ते ८०० प्रति दिवस इतके वाढले आहेत, ज्यामुळे लागवडीचा एकूण खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या अनपेक्षित खर्च वाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
तालुक्यात शेतीकामासाठी स्थानिक मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे, कांदा लागवडीसाठी विशिष्ट देवीत काम पूर्ण करणे आवश्यक असते, त्यामुळे शेतकरी जास्त मजुरी देऊनही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पिंपरी-निगडी मेट्रो मार्गाचे 35 टक्के काम पूर्ण; डिसेंबर 2026 पर्यंत काम पूर्ण होणार?
७०० ते ८०० मजुरी, वाहतूक आणि इतर खर्चामुळे कांदा लागवडीचा प्रति एकर खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे, लागवड तर महागली आहेच, पण पीक तयार झाल्यावर भाव काय मिळेल, याची भीती शेतक-यांना सतावत आहे. जर कांद्याला योग्य भाव मिळाला नाही, तर केलेला खर्चही वसूल होणार नाही.
गेल्या काही वर्षांपासून कांद्याच्या निर्यातबंदीच्या सरकारी धोरणामुळे शेतकऱ्याऱ्यांना बाजारपेठेत चांगले भाव मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही, ज्यामुळे आधीच शेतकरी चिंतेत आहेत.
मागील वर्षीं जे काम 400-500 मध्ये होत होते, त्यासाठी आज 700 ते 800 द्यावे लागत आहेत. कांदा लागवड करणे आवश्यक आहे. म्हणून नाइलाजाने आम्ही है बाढीव दर देत आहोत. सरकारने या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे,
– सीताराम बापू डुंबरे, कांदा उत्पादक शेतकरी, उदापूर
जुन्नरमधील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या वाढल्या मजुरीच्या दरावर, शासनाच्या धोरणांवर आवाज उठवण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यात त्यांना दिलासा मिळू शकेल.
कैलास बुगदे, प्रगतिशील शेतकरी