Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devgadh Mango Farmers: देवगडच्या आंबा बागायतदारांवर १० वर्षांतील सर्वात मोठे अरिष्ट; पालकमंत्री नितेश राणेंना साकडे

नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आल्याने यंदा भरघोस उत्पादनाची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र मोहोरासोबत पालवीही मोठ्या प्रमाणात आल्याने तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव वाढला.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 06, 2026 | 04:27 PM
Devgadh Mango Farmers: देवगडच्या आंबा बागायतदारांवर १० वर्षांतील सर्वात मोठे अरिष्ट; पालकमंत्री नितेश राणेंना साकडे
Follow Us
Follow Us:
  • मोहोरासोबत पालवीही मोठ्या प्रमाणात आल्याने तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव वाढला
  • थ्रीप्स किडीचा प्रादुर्भाव आणि उत्पादनात घट
  • वाढत्या खर्चामुळे शेतकरी हवालदिल
Devgadh Mango Farmers: देवगड तालुक्यात आंबा पिकावर आलेल्या गंभीर अरिष्टाच्या पार्श्वभूमीवर आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ, देवगड यांच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन सध्याची भीषण परिस्थिती मांडली. यावेळी आंबा उत्पादनावर झालेल्या परिणामाची सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांना तातडीच्या दिलासादायक उपाययोजनांची मागणी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष विलास रूमडे यांच्या नेतृत्वाखाली आंबा बागायतदारांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आले.

नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आल्याने यंदा भरघोस उत्पादनाची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र मोहोरासोबत पालवीही मोठ्या प्रमाणात आल्याने तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव वाढला. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी-बागायतदारांनी मोठ्या खर्चाने फवारण्या केल्या. दरम्यान, अचानक वाढलेल्या थंडीमुळे कमाल व किमान तापमानातील फरक १० अंशांपेक्षा अधिक राहिला.

Mardaani 3 Box Office: ‘मर्दानी ३’ सातव्या दिवशीही घसरला, बुधवारी बॉक्स ऑफिसवर फक्त एवढीच कमाई

 थ्रीप्स (फुलकीड) किडीचा तीव्र प्रादुर्भाव

तापमानात घट झाल्यामुळे संयुक्त फुलांचे प्रमाण कमी झाले, तर नरफुले अधिक राहिली. परिणामी फळधारणा जवळजवळ न झाल्यासारखी असून जी थोडीफार झाली आहे, तीही झाडांच्या टोकावर असल्याने ती बेभरवशाची असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यातच गळून गेलेल्या मोहोरावर पुनर्मोहोर येत असताना त्यावर थ्रीप्स (फुलकीड) किडीचा तीव्र प्रादुर्भाव झाला आहे. या किडीवर अद्याप कोणताही ठोस उपाय उपलब्ध नसल्याने उरलेली थोडीफार आशाही संपुष्टात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

दहा वर्षांतील ही सर्वात गंभीर परिस्थिती

फवारण्या, मजुरी, कीटकनाशके व इतर निविष्ठांवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढून तो शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. मागील दहा वर्षांतील ही सर्वात गंभीर परिस्थिती असल्याचे सांगत या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने वेळीच आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी कळकळीची मागणी शेतकरी संघाच्या वतीने अध्यक्ष विलास रूमडे यांनी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

Chandrapur News: अखेर कॉग्रेसमधील तिढा सुटला! महापौरसाठी काँग्रेसचे ४ तर उपमहापौरसाठी २ उमेदवार

आंबा मोहोरावरील प्रमुख किडी

१. तुडतुडे (Mango Hopper)

ही आंब्यावरील सर्वात विनाशकारी कीड मानली जाते.

  • प्रादुर्भाव: हे कीटक मोहोर आणि कोवळ्या पालवीतील रस शोषून घेतात.
  • परिणाम: यामुळे मोहोर सुकतो आणि गळून पडतो. तुडतुडे आपल्या शरीरातून एक चिकट पदार्थ (मधुशर्करा) बाहेर टाकतात, ज्यावर काळी बुरशी (करपा) वाढते, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा येतो.

२. थ्रीप्स किंवा फुलकीड (Thrips)

सध्या कोकणात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

  • प्रादुर्भाव: हे अत्यंत सूक्ष्म कीटक मोहोराच्या दांड्यांवर आणि फुलांवर ओरखडे काढून रस शोषतात.
  • परिणाम: यामुळे फुलांच्या कडा करपल्यासारख्या दिसतात. फळधारणा झालीच तर फळांच्या देठापाशी चट्टे पडतात, ज्यामुळे फळाची गुणवत्ता खालावते.

 

Web Title: Devgadh mango farmers devgadh mango farmers face the biggest crisis in 10 years they appeal to guardian minister nitesh rane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Farmers Issue
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

घरडा इन्स्टिट्यूटची टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी; पुरुष संघाला सुवर्ण, तर महिला संघाला कांस्यपदक
1

घरडा इन्स्टिट्यूटची टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी; पुरुष संघाला सुवर्ण, तर महिला संघाला कांस्यपदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.