
दरम्यान आज पहाटे शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील फियाट कंपनी जवळ रात्री लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला. हा बिबट्या अंदाजे ४ वर्षांचा असून त्याची तात्काळ माणिकडोह निवारा केंद्राकडे रवानगी करण्यात आली.तर पिंपरखेड येथे लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे ५ वर्षे वयाचा नर बिबट जेरबंद झाला.रावडेवाडी (कवठे येमाई जवळ) आज पहाटेच अंदाजे ४ वर्षे वयाची बिबट मादी जेरबंद झाली आहे.
या जेरबंद झालेल्या या ३ तीन बिबटयांची तात्काळ माणिकडोह निवारा केंद्राकडे रवानगी करण्यात आली. दरम्यान बिबट्यांपासून बचावासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अजून ही काही प्रभावी उपायोजना काय राबविण्यात येऊ शकतात याचा ही प्राधान्याने विचारविनिमय सुरु असल्याची माहिती शिरूरचे वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली.बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी शासनाचा वन विभाग सतर्क झाला असला तरी शेतावर वस्ती करून राहणारे शेतकरी,मजूर वर्ग व नागरिकांनी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती दक्षता व खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.