Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोलिसांशी अरेरावी करून शिवीगाळ व दमदाटी करत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 08, 2026 | 12:30 AM
दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, शिवीगाळ, धमकी यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक घटना उघडकीस आहेली आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोलिसांशी अरेरावी करून शिवीगाळ व दमदाटी करत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याची घटना घडली आहे. तसेच पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी विकी बाळासाहेब हरगुडे याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार बापू हाडगळे, पोलीस शिपाई संतोष बाबर आणि शरद कारकुड हे आपले नियमित कर्तव्य बजावत असताना डायल ११२ वर एका व्यक्तीने फोन करून एक व्यक्ती मला शिवीगाळ करत असल्याची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तीला आपण नेमके कुठे आहात आणि कोण शिवीगाळ करत आहे, अशी विचारणा केली.

दरम्यान संबंधित व्यक्तीने फोनवरच पोलिसांशी अरेरावी करत “मीच पोलीस ठाण्यात येतो” असे सांगितले. त्यानंतर तो शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या आवारात आला. यावेळी तो दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले. त्याने पोलिसांशी शिवीगाळ, दमदाटी करत आरडाओरडा केला. तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करत पोलिसांकडून सुरू असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

याबाबत पोलीस शिपाई संतोष सुदाम बाबर (वय २५ वर्षे, रा. शिक्रापूर ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विकी बाळासाहेब हरगुडे (वय ३२ वर्षे, रा. सणसवाडी ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश करपे हे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : बारामतीत लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्…

गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का?

पुणे शहरापासून अत्यंत जवळचा तालुका म्हणून पुरंदरची ओळख आहे. सासवड शहर पुण्याचे उपनगर म्हणून बघितले जात आहे. मात्र, सध्या तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना संघटीतपणे मारहाण केली जात आहे. दुचाकीस्वार सायलेन्सरच्या पुंगळ्याचे मोठाले आवाज करून मोकाट फिरत आहेत. चोरीच्या मोठमोठ्या घटनांचा तपास केवळ कागदावर दिसत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी, केबल चोरून नेल्या जात आहेत. एकूणच गुन्हेगार मोकाट सुटल्याचे दिसत असून पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Police have taken major action against a drunken man who was arguing with the police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Shirur News

संबंधित बातम्या

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास
1

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा
2

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ
4

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.