Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळजी घ्या ! राज्यात आता ‘या’ आजाराने काढले डोके वर; वेळेत उपचार न झाल्यास बेतू शकतं जीवावर…

राज्यात २०२३ ते २०२५ दरम्यान हिवतापाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाली असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाची आकडेवारी सांगते. यातील सर्वात धोकादायक बाब म्हणजे पी. एफ. प्रकाराचे प्रमाण ३९ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत गेल

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 26, 2026 | 12:49 PM
काळजी घ्या ! राज्यात आता 'या' आजाराने काढले डोके वर; आरोग्य यंत्रणा 'अलर्ट'वर

काळजी घ्या ! राज्यात आता 'या' आजाराने काढले डोके वर; आरोग्य यंत्रणा 'अलर्ट'वर

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : सध्या हिवतापानंतर प्लाजमोडियम फाल्सिपॅरॉम हा जीवघेणा प्रकार राज्यासाठी मोठा धोका बनत आहे. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहता, हिवतापाच्या रुग्णांमध्ये पीएफचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असल्याचे दिसून येते. वेळेत उपचार न झाल्यास हा प्रकार थेट जीवावर बेतू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

राज्यात २०२३ ते २०२५ दरम्यान हिवतापाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाली असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाची आकडेवारी सांगते. यातील सर्वात धोकादायक बाब म्हणजे पी. एफ. प्रकाराचे प्रमाण ३९ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत गेले होते. हा प्रकार सामान्य मलेरियापेक्षा अधिक वेगाने शरीरावर परिणाम करतो. पी. एफ. मलेरियामध्ये रुग्णाची प्रकृती अचानक खालावते. मेंदूवर परिणाम होऊन ‘सेरेब्रल मलेरिया’ होण्याचा धोका असतो. यामुळे बेशुद्धावस्था, झटके येणे तसेच किडनी व लिव्हर निकामी होण्यासारख्या गंभीर गुंतागुंती उद्भवू शकतात. त्यामुळेच हा प्रकार ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखला जातो.

दरम्यान, २०२६ मध्ये २१ एप्रिलपर्यंत २७२० हिवताप रुग्ण नोंदले गेले असून, त्यापैकी ६३४ रुग्ण पी.एफ. प्रकाराचे आहेत. सध्या मृत्यू शून्य असले तरी धोका टळलेला नसल्याचेच समोर येत आहे.

सहा जिल्ह्यात हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण

जिल्हानिहाय पाहता राज्यात सहा जिल्ह्यात हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. यात गडचिरोली, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी आणि चंद्रपूर असे असून शहरी भागातही बृहन्मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, मिराभाईंदर व वसई विरार येथे हिवताप चा प्रभाव दिसून येत आहे. यावरून हा आजार केवळ ग्रामीण मर्यादित नसून शहरांमध्येही वेगाने पसरत असल्याचे स्पष्ट होते.

डासांची पैदास रोखणे महत्त्वाचे

डासांची पैदास रोखल्यास मलेरियावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते. साचलेले पाणी काढून टाकणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि डास नियंत्रणाच्या उपाययोजनांना सहकार्य करणे हे महत्त्वाचे टप्पे आहेत. भविष्यात लसींची भूमिका वाढू शकते. मात्र, सध्या सातत्यपूर्ण प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर उपचार हेच मलेरियावर मात करण्याचे सर्वात प्रभावी मार्ग आहेत.

Web Title: Health system on alert due to malaria

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • malaria
  • viral infection

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात सर्वत्र पीएफ मलेरियाचा वाढता धोका! जागतिक मलेरिया दिनानिमित्त गंभीर प्रकारावर आरोग्य यंत्रणांनी दिला गंभीर इशारा
1

महाराष्ट्रात सर्वत्र पीएफ मलेरियाचा वाढता धोका! जागतिक मलेरिया दिनानिमित्त गंभीर प्रकारावर आरोग्य यंत्रणांनी दिला गंभीर इशारा

Malaria Day: मलेरियाबाबतचे गैरसमज करा दूर! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
2

Malaria Day: मलेरियाबाबतचे गैरसमज करा दूर! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

जागतिक मलेरिया दिन का साजरा केला जातो? डासांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी अशा पद्धतीने घ्या काळजी
3

जागतिक मलेरिया दिन का साजरा केला जातो? डासांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी अशा पद्धतीने घ्या काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.