Pune News: पुणेकरांनो सावधान! खडकवासल्यातून २५ हजार क्यूसेकने विसर्ग, भिडे पूल पाण्याखाली तर...
पुणे: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्हा आणि शहर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज देखील पुणे शहरात पावसाने लावली आहे. दरम्यान खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर सुरु करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. खडकवासला धरणातून सध्या २५ हजार ६९६ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
पुणे शहरात गेले दोन ते दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून कालपासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मुठा नदी पात्रात हा विसर्ग सुरु आहे. पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नदीपात्रातील रस्ता देखील बंद झाला आहे.
धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु केल्याने नदीपात्रातील रस्ते वाहतुकीला बंद झाले आहेत. त्यामुळे पुणे शहरात वाहतुकीवर काहीसा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या विसर्गात वाढ करुन दुपारी १ वाजता २५ हजार ६९६ क्यूसेक करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरु नये. खबरदारी घ्यावी
-मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता,
मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग,
स्वारगेट, पुणे
कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
पुढील दोन ते तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Pune Breaking: पुण्यात कोसळधार; खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला, सध्याची स्थिती काय?
महाराष्ट्रात देखील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण किनारपट्टीवर तर रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहेत. मराठवाडा, विदर्भात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. समुद्राला उधाण आले आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. सांगली, सातारा जिल्ह्यात देखील चांगला पाऊस सुरु आहे. कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. वाई शहरात देखील धोम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वाईमधील प्रसिद्ध गणपती मंदिरात देखील कृष्ण नदीचे पाणी शिरले आहे.