
Pune News: कुख्यात गुंड गजा मारणे प्रचाराला पुण्यात येणार; हायकोर्टाने दिली परवानगी, पोलिस सतर्क
पुण्यात महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत
कुख्यात गुंड गजा मारणे पत्नीच्या प्रचाराला येणार
गजा मारणेला पुणे जिल्ह्यात आहे प्रवेशबंदी
पुणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. पुण्यात अत्यंत जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्रित लढत आहे. तर भाजप आणि शिवसेना युती झाली आहे. दरम्यान अजित पवारांच्या पक्षावर गुंडांना उमेदवारी दिल्याची टीका करण्यात आल्याचे दिसून येत होते. दरम्यान आता पुण्यात प्रवेशबंदी असलेला कुख्यात गुंड गजा मारणे हा प्रचारासाठी जिल्ह्यात येणार आहे.
कुख्यात गुंड गजा मारणे प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात येणार असल्याचे समजते आहे. अजित पवारांच्या पक्षाने गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी दिल्याचे समजते आहे. पत्नीच्या प्रचारासाठी गुंड गजा मारणे पुण्यात येणार असल्याचे समोर येत आहे. मात्र त्याला पुणे जिल्ह्यात प्रवेशबंदी असल्याने येतं येत नव्हते.
दरम्यान मुंबई हायकोर्टाने गुंड गजा मारणेला 15 आणि 16 जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कुख्यात गुंड गजा मारणे आता दोन दिवस आपल्या पत्नीच्या प्रचारासाठी पुण्यात येणार आहे. हायकोर्टाने काही अटी-शर्तीवर जामिन मंजूर केला आहे.
पुणे महानगरपालिका निवडणूक मोठी रंगतदार होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी शरद पवारांच्या पक्षाशी युती केली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे. गुंड गजा मारणे याने पुण्यात येण्यासाठी परवानगी मागितली होती. दरम्यान कोर्टाने पोलिसांच्या देखरेखीखाली गजा मारणेला पुण्यात प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे.
धंगेकर धावले राष्ट्रवादीच्या मदतीला
पुणे महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. राजकीय नेत्यांचे आरोप- प्रत्यारोप सुरुचं आहेत. गुंडासोबतच्या वायरल व्हिडिओमुळे अमोल बालवडकर यांचे तिकीट कापले असे चंद्रकांत पाटील सभेमध्ये म्हणाले होते, आता रवींद्र धंगेकर यांनी गुंड निलेश घायवळ सोबतचे चंद्रकांत पाटलांचे फोटो व्हायरल करत चोख प्रतिउत्तर दिले आहे.
Pune Election : धंगेकर धावले राष्ट्रवादीच्या मदतीला; चंद्रकांत पाटलांचा ‘तो’ फोटो केला शेअर
चंद्रकांत पाटील संवेदनशील असतील तर कोथरूडमध्ये गुंडगिरी फोफावली असती का? असा सवाल रवींद्र धंगेकरांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या अमोल बालवडकरांवरती प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याला जशास तसे उत्तर शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांच्याकडून ट्विट करून देण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मदतीला शिवसेना धावली असे चित्र पुणे शहरामध्ये निर्माण झाले आहे. गुंडगिरी विषयी नैतिकतेचे धडे देणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी अमोल बालवडकर यांना लावलेल्या नियमाप्रमाणे कोल्हापूरला जायला हवे, असा खोचक टोला लगावला आहे.