कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेताना वाटेत झालेल्या मटण बिर्याणीच्या पार्टीवेळी त्याला पैशांसह विविध प्रकारची मदत करणाऱ्याच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे.
कुख्यात गुंड गजा मारणेसोबत धाब्यावर पार्टी करणाऱ्या त्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून चार महागड्या कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पुण्यात कुख्यात गुंड गजानन उर्फ गज मारणे याला पोलिसांच्या संरक्षणात असताना सांगली कारागृहात नेण्यात येत होते. त्यावेळी थेट त्याने मध्यरस्त्यात महामार्गावरील ढाब्यावर 'मटण पार्टी' केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मारहाण करणाऱ्या आरोपींव्यतिरिक्त कोणीही घटनास्थळी हजर नव्हते, आरोपींनी कोणाच्याही सांगण्यावरून मला मारहाण केली नाही, असे तक्रारदार तरुणाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
पुणे पोलिसांचे ‘टोळ्यां’चा बिमोड करण्याचे स्वप्न हे सातत्याने दिव्यच राहत असल्याचे परिस्थितीवरून तरी दिसत आहे. दिवसेंदिवस टोळ्यांची संख्या अन् गुन्हेगारीचं वलय वाढत असल्याचेही दिसत आहे.
कोथरूड भागात सात दिवसांपुर्वी मारणे टोळीतील गुंडाकडून देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण झाली. मारहाणप्रकरणात प्रथम पोलिसांनी ३२४ नुसार गुन्हा नोंदवला होता.
कोथरूड परिसरात एका निरपराध तरुणाला झालेल्या मारहाण प्रकरणात पुणे पोलिसांनी तीन दिवसांनी कडक भूमिका घेत कुविख्यात गुंड गजानन मारणे, रूपेश मारणे यांच्यासह ६ जणांवर मोक्का कारवाई केल्याची माहिती देण्यात आली…
कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीतील मुलांकडून निरपराध मुलाला झालेल्या मारहाण प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलिसांच्या कामावर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुविख्यात गुंड गजानन मारणेच्या मंडळाने काढलेल्या मिरवणूकीत एका निरपराध तरुणाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.