Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देखणे हे रूप दिसे! ‘श्रीमंतां’च्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर; पुण्यनगरीत भविकांचा उत्साह

Ganeshotsav: रस्त्यांवर भाविकांची गर्दी, ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त, खाद्यपदार्थांच्या स्टॉलभोवतीची लगबग आणि गणेश मंडळांची आकर्षक रोषणाई यामुळे मध्यवर्ती पुणे रात्री उशिरापर्यंत उत्साहाने फुलून गेले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 19, 2026 | 03:25 PM
देखणे हे रूप दिसे! ‘श्रीमंतां’च्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर; पुण्यनगरीत भविकांचा उत्साह
Follow Us
Follow Us:
  • बाप्पांच्या दर्शनासाठी रस्त्यांवर भाविकांचा महापूर
  • बाप्पांच्या दर्शनासाठी मध्यवर्ती पुण्यातील रस्ते भाविकांनी फुलले
  • दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला अलोट गर्दी 

Pune/ Ganeshotsav 2026: ढोल-ताशांचा गजर, आकर्षक विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गुरुवारी रात्री मध्यवर्ती पुणे अक्षरशः गजबजून गेले. शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. लक्ष्मी रस्ता, मंडई, शनिवारवाडा परिसरासह मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत उत्सवी वातावरण होते.

दिवसभराच्या कामकाजानंतर कुटुंबासह गणपती दर्शनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची संख्या रात्री वाढत गेली. प्रमुख गणेश मंडळांच्या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मंडळांच्या आकर्षक सजावटी, विद्युत रोषणाई आणि जिवंत देखावे पाहण्यासाठीही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे दर्शनासोबतच गणेशोत्सवाचा उत्साह अनुभवण्यासाठी भाविकांची पावले मध्यवर्ती भागाकडे वळत होती.

पौरणिक देखाव्यांपासून…! पुण्यात गणेशोत्सवाचा अनोखा उत्साह; संध्याकाळी पेठांमध्ये अलोट जनसागर

भाविकांची वाढती संख्या आणि वाहनांची वर्दळ यामुळे लक्ष्मी रस्ता, मंडई परिसरासह विविध मार्गांवर वाहतूक कोंडी झाली. अनेक नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी मेट्रोचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे मंडई मेट्रो स्थानकासह मार्गावरील स्थानकांवरही भाविकांची वर्दळ वाढली होती. मेट्रो स्थानकातून बाहेर पडल्यानंतर नागरिकांचे समूह प्रमुख गणेश मंडळांच्या दिशेने पायी जाताना दिसत होते.

कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली होती. मंडई, लक्ष्मी रस्ता, बुधवार पेठ आणि परिसरातील रस्त्यांवर भाविकांचे समूह दिसत होते. देखावे आणि रोषणाई पाहण्यासाठी ठिकठिकाणी नागरिक थांबत असल्याने गर्दीत आणखी भर पडत होती.

रस्त्यांवर भाविकांची गर्दी, ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त, खाद्यपदार्थांच्या स्टॉलभोवतीची लगबग आणि गणेश मंडळांची आकर्षक रोषणाई यामुळे मध्यवर्ती पुणे रात्री उशिरापर्यंत उत्साहाने फुलून गेले होते. गर्दी आणि वाहतूक कोंडीचा त्रास होत असतानाही बाप्पांच्या दर्शनाचा उत्साह भाविकांमध्ये कायम असल्याचे चित्र होते.

‘बाप्पा, तू माझ्याच हातांनी घडलास!’; गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये अनुभवायला मिळतोय भक्तीचा खरा आनंद

गर्दीची प्रमुख ठिकाणे 

लक्ष्मी रस्ता – गणेश मंडळांचे देखावे व रोषणाई पाहण्यासाठी मोठी वर्दळ
मंडई परिसर – भाविकांची सतत ये-जा आणि मेट्रोमुळे वाढलेली गर्दी
बुधवार पेठ – प्रमुख मंडळांकडे जाणाऱ्या भाविकांची गर्दी
शनिवारवाडा परिसर – गणेशोत्सवाचा माहोल अनुभवण्यासाठी नागरिकांची वर्दळ
मानाचे गणपती – कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Web Title: Huge crowds of devotees in pune city for ganpati darshan shriman dagdusheth ganpati 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Ganesh Festival
  • Ganeshotsav 2026
  • pune ganpati

संबंधित बातम्या

Gauri Ganpati Visarjan: गौरी-गणपती विसर्जनाची परंपरा काय? जाणून घ्या घरगुती पूजेपासून विसर्जनापर्यंतची पद्धत
1

Gauri Ganpati Visarjan: गौरी-गणपती विसर्जनाची परंपरा काय? जाणून घ्या घरगुती पूजेपासून विसर्जनापर्यंतची पद्धत

पौरणिक देखाव्यांपासून…! पुण्यात गणेशोत्सवाचा अनोखा उत्साह; संध्याकाळी पेठांमध्ये अलोट जनसागर
2

पौरणिक देखाव्यांपासून…! पुण्यात गणेशोत्सवाचा अनोखा उत्साह; संध्याकाळी पेठांमध्ये अलोट जनसागर

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’
3

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
4

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.