Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Rain Alert: पुण्यनगरीत पावसाचा जोर ओसरला; मात्र धोका कायम, घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस…

पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने राज्यातील पावसाची तीव्रता घटत आहे. त्यामुळे पुणे शहरात पुढील काही दिवस अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 05, 2026 | 08:37 PM
Pune Rain Alert: पुण्यनगरीत पावसाचा जोर ओसरला; मात्र धोका कायम, घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस…
Follow Us
Follow Us:
  • पुणे शहरात पावसाचा जोर ओसरणार
  • घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा कायम
  • खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे संपूर्ण क्षमतेने भरली
पुणे: पुणे शहरातील पावसाचा जोर आता कमी होण्याची शक्यता असली तरी जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा कायम आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवार (ता. ६) पुणे जिल्ह्यातील घाट विभागासाठी ‘ऑरेंज अलर्ट’, तर शुक्रवार (ता. ७) ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे शहर व परिसरात पुढील दोन दिवस सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण राहून हलक्या ते अत्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, घाट परिसरात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडू शकतो. गेल्या कही दिवसांपासून पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे संपूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पाणीकपात देखील मागे घेण्यात आली आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  शहरात पावसाचा जोर कमी असला तरी धरणसाखळी परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे विसर्ग केला जात आहे. पाण्याची आवक क्षमता पाहून विसर्ग कमी जास्त केला जाऊ शकतो.

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर; ‘या’ जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुंबई-ठाण्याला यलो अलर्टचा इशारा

पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने राज्यातील पावसाची तीव्रता घटत आहे. त्यामुळे पुणे शहरात पुढील काही दिवस अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. खरीप पिकांतील आंतरमशागतीसाठी हा कालावधी अनुकूल ठरू शकतो. पुढील दोन दिवस राज्यातील जोरदार पावसाचा प्रभाव प्रामुख्याने पश्चिम घाट आणि कोकणातील काही भागांपुरता मर्यादित राहण्याचा अंदाज आहे.

बुधवारी (ता.५) पुण्यात २७ अंश सेल्सिअस कमाल, तर २२.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. गुरुवारी कमाल तापमानात किंचित वाढ होऊन ते २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. शहरात दिवसभर सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण राहून अत्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Koyna Dam: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ठिकाण  – पाऊस (मिमी)

कुर्वंडे –  १६.०
भोर –  ८.०
एनडीए – ५.०
पाषाण –  ४.२
चिंचवड – २.५
तळेगाव – २.५
शिवाजीनगर – २.२
गिरीवन – २.०
कोरेगाव पार्क –  २.०
निमगिरी –  १.५
दुदुळगाव – १.५
हडपसर –  १.५
दापोडी – १.०
माळीण – १.०

Web Title: Imd yellow alert to pune and orange alert to ghatmatha heavy rainfall weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 08:37 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Pune Rain News
  • Rain Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.